दहावी आणि बारावीच्या परीक्षा प्रत्यक्ष होण्याची शक्यता, ऑनलाईन परीक्षा घेण्यास बोर्ड अनुकूल नाही, ग्रामीण भागांत Internet connectivity चा प्रश्न असल्याचं शिक्षण विभागाचं मत
(Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत यावर्षीच्या दहावी व बारावीची लेखी परीक्षा ऑफलाइन होईल. कारण बोर्ड ऑनलाईन परीक्षा घेण्यास अनुकूल नाही.
Civid-19 च्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने १० वी आणि १२ वीच्या परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. आढावा बैठकीत दहावी-बारावीच्या परीक्षांचे आयोजन कसे करावे याबद्दल चर्चा केली. चर्चेच्या वेळी बोर्ड ऑफलाईन परीक्षा घेण्याच्या बाजूने असल्याचे दिसते. तर ही परीक्षा ऑनलाईन होणार नाही हे स्पष्ट आहे.