100 days Reading Campaign
१०० दिवसांकरिता वाचन अभियान
भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालायातर्फे राज्य सरकारच्या सहाय्याने बालवाटिका ते इयत्ता आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्याकरिता जानेवारी २०२२ ते एप्रिल २०२२ या कालावधीत १०० दिवसांकरिता वाचन अभियान (100 days Reading Campaign)राबविण्यात येणार आहे.
या अभियानातर्गत १०० दिवसांकरिता खाली दिलेल्या आठवडानिहाय उपक्रमांचे नियोजन देण्यात येत आहे.दिलेल्या नियोजनानुसार उपक्रमाची आठवडानिहाय अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.वाचन आनंददायी पद्धतीने होण्याकरिता सदर उपक्रमाची साध्या, सहज व आनंददायी पद्धतीने रचना करण्यात आलेली आहे.या रचनाचे संचलन सुकर होण्याकरिता आवश्यक संदर्भ साहित्य/स्त्रोत हे शाळा,घर या स्तरावर सहज उपलब्ध होऊ शकेल अशा पद्धतीने देण्यात आलेले आहे तसेच शाळा बंद असण्याच्या स्थितीत करावयाच्या कृतीही देण्यात आल्या आहेत.आवश्यक बदलांबाबतही यात सूचित करण्यात आलेले आहे.
सदर विषयाच्या अनुषंगाने खालील सूचना
- १. १०० दिवसांकरिता वाचन अभियान या कार्यक्रमाची दि.१ जानेवारी पासून सर्व व्यवस्थापनाच्या ,सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये अंमलबजावणी करण्यात यावी.
- २. सर्व पर्यवेक्षक यंत्रणांनी अभियानाच्या जनजागृतीकरिता प्रयत्नशील रहावे.
- ३. प्रत्येक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेद्वारे सदर कार्यक्रमाच्या गुणवत्तेचे सनियंत्रण करण्याकरिता गोष्टीचा शनिवार या उपक्रमाचे समन्वयक यांना जिल्हास्तरीय नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात यावे.
- ४. अभियानातील विविध उपक्रमाबाबत अहवाल तयार करण्यात यावा,तसेच नोडल अधिकारी यांनी अभियानाचे योग्य व्हिडीओ तयार करून तसेच क्षणचित्रे निवडून लिंक मध्ये अपलोड करावेत.या बाबतची लिंक स्वतंत्ररित्या कळवण्यात येईल .
- ५. या वाचन अभियान उपक्रमाच्या सोशल मिडिया वरील प्रसारासाठी पुढील Hashtag वापरण्यात यावा.#100days Reading Campaign #Padhe Bharat.
दि.१ जानेवारी २०२२ पासून सोबत जोडलेल्या नियोजनानुसार व सूचनांनुसार आपल्या अधिनस्त सर्व व्यवस्थापनाच्या तसेच सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये अभियानाची योग्य व यशस्वी अंमलबजावणी करण्यात यावी.