सन 2021-22 मधील इ.11 वी प्रवेशाबाबत सूचना
- सामाईक प्रवेश परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक आहे परंतु इ.11वी प्रवेश देतांना सामाईक प्रवेश परीक्षा (CET) दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश देण्यात येतील आणि अशा विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्यानंतर
- उर्वरित जागांवर इतर विद्यार्थ्यांना इ.10वी मूल्यमापन पद्धतीनुसार प्राप्त गुणांच्या आधारे प्रवेश दिले जातील.
- सामाईक प्रवेश परीक्षेची कार्यवाही पूर्ण होत नाही तोपर्यंत इ.11वी मध्ये प्रवेश देता येणार नाहीत.
सामाईक प्रवेश परीक्षेनंतर राज्यातील सन.2021-22 मधील इ.11वी प्रवेश प्रक्रियेबाबत कार्यपद्धती स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. तोपर्यंत कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयांना इ.11वी साठी प्रवेश प्रक्रिया सुरु करता येणार नाही.