11th admission preference in 2022-23 (Part-2) started
११ वी २०२२-२३ मधील प्रवेशासाठी विद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविणे (भाग-२)
CAP Option Form + Quota Choices
राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र (MMR) तसेच पुणे, पिंपरीचिचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील इ. ११वी चे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत. उक्त पाच क्षेत्र वगळता उर्वरित महाराष्ट्रातील प्रवेश स्थानिक परिस्थितीनुसार प्रचलित पद्धतीने केले जातील. त्याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी सविस्तर सूचना निर्गमित कराव्यात.
राज्यमंडळाच्या मार्च-२०२२ मध्ये झालेल्या इ. १०वी परीक्षेचा निकाल दि. १७/०६/२०२२ रोजी जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्याची गुणपत्रकेही विद्यार्थ्यांना प्राप्त झालेली आहेत. सबब राज्यातील सन २०२२-२३ साठी इ.११ वी मध्ये प्रवेश देण्याची कार्यवाही सुरु करता येईल.आणखी काही शिक्षण मंडळांचे इ.१० वी परीक्षेचे निकाल येणे अद्याप बाकी आहे.अन्य मंडळांकडून इ. ११ वी साठी राज्यमंडळाकडे प्रवेश घेण्याचे प्रमाण प्रामुख्याने शहरी भागामध्ये दिसून येते. सबब सन २०२२-२३ मधी इ. ११ वी प्रवेशाबाबत पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
ज्या क्षेत्रामध्ये इ.११वी चे प्रवेश विद्यालय स्तरावरुन Offline केले जातात त्या ग्रामीण भागातील, (भौतिक सुविधांची पडताळणी करुन प्रवेश क्षमता निश्चित करणेची कार्यवाही पूर्ण झालेल्या) कनिष्ठ महाविद्यालयांतील इ. ११वी प्रवेश प्रक्रिया सुरु करावी.
ज्या क्षेत्रामध्ये इ. ११वी चे प्रवेश केंद्रीय ऑनालईन पद्धतीने केले जातात सदर ठिकाणची इ. ११वी प्रवेश पक्रिया सीबीएसई मंडळाच्या इ.१०वी निकालानंतर सुरु करण्यात येईल. तोपर्यंत भौतिक सुविधांची पडताळणी करुन प्रवेश क्षमता निश्चित करणेची कार्यवाही पूर्ण करावी. केंद्रीय ऑनलाईन प्रवेश क्षेत्रातील इ.११वी प्रवेशाबाबत पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी.
मुंबई महानगर क्षेत्र (MMR), पुणे, पिंपरी-चिचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील इ. ११वी चे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असल्याने या शहरांमध्ये राबविण्यात येणाऱ्या इ.११वी प्रवेश प्रक्रियेचीसाठी https://11thadmission.org.in ह्या पोर्टलच्या माध्यमातून प्रवेश अर्जाचा भाग-१ भरण्याची कार्यवाही सुरु आहे; ती यापुढेही सुरु राहील. राज्यमंडळ इ.१० वी परीक्षेचा निकाल जाहीर झालेल्या असल्याने बहुतांश विद्यार्थी अर्जाचा भाग-२ भरण्याची व प्रवेशाच्या फेऱ्या सुरु होण्याची प्रतीक्षा करीत आहेत. सबब, त्यांचा पुढील वेळ वाचवता यावा यासाठी;
ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्जाचा भाग-१ पूर्ण केलेला आहे त्यांचेसाठी पसंतीक्रम देणे अर्थात अर्जाचा भाग-२ Option Form भरण्याची कार्यवाही सुरु करण्यात येत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना इ. ११वी प्रवेशासाठी आपल्या पसंतीची विद्यालये निवडून त्यांचे पसंतीक्रम/Preferences ऑनलाईन नोंदविता येतील. त्यासोबतच कोटांतर्गत प्रवेशासाठीही पसंतीच्या विद्यालयांमध्ये ऑनलाईन Apply करता येईल. याद्वारे केवळ पसंती नोदविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे प्रत्यक्ष प्रवेशासाठीचे वेळापत्रक सीबीएसई निकालानंतर जाहीर करण्यात येईल. प्रवेश फेरी पूर्वीचे कार्यवाहीचा तपशील सोबत संलग्न आहे.
चालू वर्षी केंद्रीय प्रवेशाच्या (CAP Seats) जागांसाठी अर्जाचा भाग-२ मध्ये पसंतीक्रम देण्यासोबतच कोटांतर्गत जागांवरील (Quota Seats) प्रवेशासाठी ऑनलाईन Apply करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. अशाप्रकारे कोटांतर्गत प्रवेशासाठी ऑनलाईन Apply केलेल्या विद्यार्थ्यांची यादी विद्यालयांना दर्शविण्यात येईल व त्यानुसार गुणवत्तेनुसार कोटा प्रवेश देणे विद्यालयांना सुलभ होईल. सध्या केवळ Apply करता येईल, प्रत्यक्ष प्रवेशाची कार्यवाहीसाठी वेळापत्रक नंतर देण्यात येईल.
CAP जागांसाठी अर्ज भाग-२ मध्ये विद्यार्थ्यांना किमान एक व कमाल दहा विद्यालयांसाठी पसंतीक्रम नोंदविता येतील व अर्ज लॉक करणे आवश्यक असेल. कोटांतर्गत प्रवेश ऐच्छिक असलेने त्यासाठी अशी कोणतीही सक्ती असणार नाही.
प्रवेशासाठी फेरीद्वारे विद्यालय / Allotment देणे तसेच मिळालेल्या विद्यालयात (कोटा प्रवेशासह) प्रवेश निश्चित करणे याबाबत तपशीलवार वेळापत्रक सीबीएसई निकालानंतर देण्यात येईल.
CBSE मंडळाच्या इ.१०वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग-१ व भाग-२ भरण्यासाठी निकालानंतर पुरेसा वेळ देण्यात येईल, त्यानंतरच प्रत्यक्ष प्रवेश फेरी सुरु करण्यात येईल.
भाग-२ मध्ये CAP Seats साठी Preferences तसेच Quota Seats साठी Choices भरल्यानंतर त्यापुढील प्रवेश प्रक्रियेचे टप्पे तसेच प्रवेश फेऱ्यांचे नियमांबाबत जागृती करण्यात यावी, त्याबाबत तपशील प्रवेश प्रक्रियेच्या माहितीपुस्तिकेमध्ये देण्यात आलेला आहे. सदर Information Booklet सर्वांसाठी प्रवेश प्रक्रियेच्या पोर्टलवर उपलब्ध आहे, ते इंग्रजी व मराठी द्विभाषिक स्वरुपात देण्यात आलेले आहे. याबाबत सर्व संबंधितांना अवगत करावे.
अर्ज भाग-२ कार्यवाही दिनांक-२२/०७/२०२२ पासून सुरु होत आहे.
