Table of Contents
११ वी online पद्धतीने प्रवेश प्रक्रिया उद्या पासून सुरुवात
Std.11th Online Admission Process 2021-22
सन 2021-22 मध्ये इ.11वी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा CET लागू करण्यात आलेली होती. शासन निर्णय दि.11/08/2021 अन्वये सदर सामाईक प्रवेश परीक्षा CET रद्द करण्यात आलेली आहे. तसेच रिट याचिका क्र.1413/2021 मध्ये मा.उच्च न्यायालय मुंबई यांचे इ.11वी ची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याबाबत निदेश आहेत. त्यानुसार राज्यातील इ.11वी प्रवेशाची कार्यवाही सुरु करता येईल.
सन.२०२१-२२ मध्ये राज्यातील, मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर, नाशिक, व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील इ.११वी चे सर्व प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पद्धतीने करण्यात येणार आहेत. सदर ५ ठिकाणच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक यासोबत संलान आहे. उक्त पाच क्षेत्र वगळता उर्वरित महाराष्ट्रातील प्रवेश स्थानिक परिस्थितीनुसार प्रचलित पद्धतीने केले जातील. त्याबाबत संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी सविस्तर सूचना निर्गमित कराव्यात.
मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर, नाशिक, व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील इ.११वी प्रवेशाबाबत यापूर्वी वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले होते. न्यायालयीन आदेशानुसार प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करणेसाठी सदर वेळापत्रकामध्ये बदल करुन विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर प्रत्यक्ष अर्ज भरण्याची सुविधा दि.14 ऑगस्ट, 2021 पासून सुरु करण्यात येत आहे. दि.23/07/2021 रोजीच्या परिपत्रकानुसार देण्यात आलेल्या इतर सूचना कायम राहतील.
ऑनलाईन अर्ज भरणे, विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविणे, पसतीक्रम देणे, प्रवेश फेरीमध्ये मिळालेल्या विद्यालयात प्रवेश निश्चित करणे याबाबत (पहिल्या फेरीसाठी) तपशील वेळापत्रकामध्ये देण्यात आलेला आहे. दिलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही वेळेत केली जाईल याची दक्षता घ्यावी. यापूढील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल.
1 ADMISSION PROCESS SCHEDULE


2 Intro. to 11th Admission Process 2021
TAG-11th std online admission process,11th standard online admission process,11 standard online admission process,std. 11th centralised online admission process 2020-21,std.11th centralize online admission process 2020-21,std.11th centralised online admission process 2020-21 maharashtra,std. 11th centralised online admission process 2021-22,11th std admission process,11 std admission process,std. 11th centralised online admission process 2020-21