SCERT मार्फत ज्ञानगंगा या शैक्षणिक कार्यक्रम 14 जून २०२१ पासून सह्याद्री वाहिनीवर सुरुवात
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कोरोनास म्हणून घोषित केले असल्याने राज्यामधील या असाधारण आपत्कालीन परिस्थितीमुळे राज्यामध्ये विविध निबंध लागू करण्यात आले आहेयामुळे राज्यातील शाळा बंद असल्याने या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी डी.डी. सह्याद्री वाहिनीवरून दिनांक १४ जून, २०२१ पासून सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये दैनिक ५ तास (३०० मिनिटे) इयत्तानिहाय तासिकांचे प्रक्षेपण केले जाणार आहे.
-
सदरचे प्रक्षेपण सोमवार ते शुक्रवार सकाळी ७:३० ते ३:३० या वेळेमध्ये डी.डी. सह्याद्री वाहिनीच्या काही नियोजित बातम्यांची वेळ वगळता प्रक्षेपित केले जाणार आहे.
-
प्रथम टप्प्यामध्ये इयत्ता १० वी मराठी माध्यम इंग्रजी माध्यम तसेच इयत्ता १२ वीच्या तीनही शाखांच्या शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण सुरु करण्यात येत आहे.
-
उर्वरित इयत्तांच्या तासिकांचे प्रक्षेपण देखील लवकरच सुरु करण्यात येणार आहे.
सदरच्या शैक्षणिक कार्यक्रमाच्या दैनिक प्रसारणाचे सविस्तर वेळापत्रक हे राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर प्रदर्शित केले जाणार आहे.
विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शनासाठी वेबिनार वेळापत्रक
वेळापत्रक
DD Sahyadri Timetable 14th June To 18th June, 2021
DD Sahyadri Timetable 21st June To 25th June, 2021
DD Sahyadri Timetable 28th June to 2 July, 2021