एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा २०२१-२२ ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
Elementary and Intermediate Drawing Grade Exam 2021-22 Online Application Process
Government Drawing Examination 2021-22 Online Application Process: शैक्षणिक वर्ष २०२१-२२ माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत इयत्ता १० दहावीत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता फक्त इंटरमिजिएट ड्राइंग ग्रेड परीक्षा ऑनलाईन पध्दतीने दिनांक २२ व २३ फेब्रुवारी २०२२ रोजी आयोजित करण्यात येणार आहेत.
तसेच एलिमेंटरी ड्राईंग ग्रेड परिक्षेबाबत स्वतंत्ररित्या कला संचनालयाच्या http://doa.maharashtra.gov.in स्थळावर कळविण्यात येईल. तसेच कला संचनालयाच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय-अशासकीय कला महाविद्यालयातील वर्षे २०२१-२०२२ मध्ये मुलभूत अभ्यासक्रम (फाउंडेशन कोर्स) तसेच कला शिक्षक प्रशिक्षण प्रथम वर्ष अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रविष्ट होता येईल.
ऑनलाईन पध्दतीने इंन्टरमिजिएट ड्राईंग ग्रेड परीक्षा २०२१-२२ करिता विद्यार्थ्यांची नाव नोंदणी परीक्षेचे वेळापत्रक व मार्गदर्शक सूचना खालील संकेत स्थळावर http://doaonline.in/doadrawinggradeexam/public/login
दिनांक १२ फेब्रुवारी २०२२ ते २० फेब्रुवारी २०२२ उपलब्ध असणार आहे.
मुल्यमापन करण्याकरिता कार्यरत कलाशिक्षकांना परीक्षक, समालोचक,उपमुख्य समालोचक, याकरिता मुख्यध्यापकांच्या शिफारशीसह अर्ज ऑनलाईन पध्दतीने वरील संकेत स्थळावर दिनांक १४ फेब्रुवारी २०२२ ते २३ फेब्रुवारी २०२२ पर्यंत भरता येईल.
एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड २०२१ ची परीक्षेच्या संभाव्य तारखा जाहीर
Probable dates for Elementary and Intermediate Drawing Grade 2021 exams announced
The Directorate of Arts has initiated proceedings at the Directorate level for conducting Government Drawing Examination 2021 entirely online and the probable examination dates have been announced as follows.
शासकीय रेखाकला परीक्षा (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) २०२१ परीक्षेबाबतची माहिती व वेळापत्रक दिनांक १८ जानेवारी २०२२ पर्यंत प्रसिध्द करण्यात येणार होते.त्याप्रमाणे कला संचालनालयाने शासकीय रेखाकला परीक्षा २०२१ संपूर्णत: ऑनलाईन पध्दतीने आयोजीत करण्याबाबत संचालनालय स्तरावर कार्यवाही सुरु केलेली असून खालील प्रमाणे संभाव्य परीक्षा तारखा जाहीर केल्या आहे.
परीक्षा नाव | परीक्षा तारीख |
---|---|
इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा | दिनांक १२ व १३ फेब्रुवारी, २०२२ |
एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षा | दिनांक १४ व १५ फेब्रुवारी, २०२२ |
Government Drawing Examination (Elementary and Intermediate Drawing Grade) 2021 to be held online
शासकीय रेखाकला परीक्षा (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) २०२१ होणार ऑनलाईन
एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड २०२१ च्या परीक्षेबाबत संचालनालय स्तरावर कार्यवाही सुरु करण्यात आली असून सर्व विद्यार्थी/पालक/शिक्षक यांना कळविण्यात येते की, कोव्हीड / १९ व ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मा.ना.श्री.उदय सामंत, मंत्री (उच्च व तंत्रशिक्षण), महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या आदेश व केलेल्या घोषणेनुसार सर्व परीक्षा ऑनालाईन पध्दतीने घेण्याच्या अनुषंगाने तसेच इयत्ता १० वीतील विद्यार्थी सवलतीच्या गुणांपासून वंचित राहू नये याकरिता शासकीय रेखाकला परीक्षा संपूर्णत: ऑनलाईन पध्दतीने माहे फेब्रुवारी, २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यामध्ये घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. परीक्षेबाबतची माहिती व वेळापत्रक दिनांक १८ जानेवारी, २०२२ पर्यंत प्रसिध्द करण्यात येईल.
- एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड २०२१
- परीक्षा – ऑनलाईन पध्दतीने माहे फेब्रुवारी, २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यामध्ये
- वेळापत्रक – दि १८ जानेवारी, २०२२ पर्यंत प्रसिध्द होईल.आम्हाला जॉईन करून ठेवा.
शासकीय रेखाकला परीक्षा (एलिमेंटरी व इंटरमिजिएट) २०२१ चे आयोजन संपूर्णत: ऑनलाईन पध्दतीने करावयाचे असल्याने पेपर तपासणीकरिता आवश्यक असणारे परीक्षक, समालोचक व उपमुख्य समालोचक यांनी आपले अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरावयाचे आहेत. याबाबतची माहिती दिनांक १८ जानेवारी, २०२२ पर्यंत प्रसिध्द करण्यात येईल.
Nice
… Tk