इ.१०/१२ वी बोर्ड परीक्षेच्या निकालाबाबत महत्वाची Update
Important Update on 10th / 12th Board Exam Results
माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा मार्च / एप्रिल – २०२२ परीक्षेसंदर्भात विविध वृत्तपत्रातील प्रसिध्द केलेल्या बातमीत ‘राज्यातील विविध मागण्यांकरिता विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनी इ. १०/१२ वी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. राज्य मंडळाकडून पाठविण्यात आलेल्या उत्तरपत्रिका राज्यातील २५ हजार शिक्षकांनी परत पाठविल्या आहेत. शिक्षकांनी उत्तरपत्रिकांचे गढे घेण्यास नकार दिल्याने अनेक गढे टपाल कार्यालयात पडून असून त्यामुळे इ.१०/१२ वी चा निकाल विलंबाने लागण्याची शक्यता आहे’. अशी बातमी प्रसिध्द केली आहे.
इ.१०/१२ वी परीक्षांचा निकाल विहित वेळेत वेळापत्रकानुसारच लागणार- डॉ. सुभाष बोरसे
उपरोक्त बातमीनुसार मुंबई विभागीय मंडळ कार्यालयाकडून निवेदन जाहीर करण्यात येते की, सदरची प्रसिध्द केलेली बातमी तथ्यहीन असून कोणत्याही प्रकारे बोर्डाच्या उत्तरपत्रिका इ. १०/१२ वी च्या शिक्षकांनी नाकारल्या नसून टपाल कार्यालयाकडे किंवा मंडळामध्ये उत्तरपत्रिकांचे गट्टे परत आलेले नाहीत. वृत्तपत्रात प्रसिध्द झालेले छायाचित्र हे कोणत्याही टपाल कार्यालयातील दिसून येत नाही मुळात कस्टडीमधून गठ्ठे कापडीपिशवीत सिलबंद करून पाठविले जातात मोकळ्या स्वरूपात कधीच पाठविले जात नाही.सदर छायाचित्र हे टपालकार्यालयामधील वा माध्यमिक शिक्षण मंडळ कार्यालयाचे नाही. त्यामुळे सदर छायाचित्र दिशाभूल करणारे आहे.
याबाबतची वस्तुस्थिती अशी की, टपाल कार्यालयाचा मागील दोन दिवस संप असल्याने उत्तरपत्रिकांचे गठे वितरीत करण्यास तात्पुरता विलंब झाला होता. तद्नंतर टपाल कार्यालय नियमित सुरू असून उत्तरपत्रिका वितरणाचे काम सुरळीतपणे सुरू असून माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची कार्यवाही मंडळाच्या नियोजित वेळापत्रकानुसार सुरू आहे.
सदर बातमीच्या अनुषंगाने विद्यार्थी अथवा शिक्षकांनी विचलित न होता परीक्षा अथवा निकाल विषयक सामाजिक माध्यमातून प्राप्त होणाऱ्या वृत्तांवर विश्वास ठेवू नये. विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा निकाल विहित वेळेत वेळापत्रकानुसार लावण्यासाठी मंडळस्तरावरून प्राधान्याने कार्यवाही सुरू आहे.
-डॉ. सुभाष बोरसे विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,मुंबई