जागतिक महिला दिन भाषण
World Women’s Day speech
आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष……. आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुजनवर्ग माझ्या मित्र मैत्रिणींनो आणि महिला दिन साजरा करण्यासाठी जमलेल्या माझ्या तमाम महिला भगिनींनो………..
स्री म्हणजे जन्मदाती,
स्त्री म्हणजे संस्कृती,
स्त्री म्हणजे नावीन्याचा वसा,
स्त्री म्हणजे घराचं घरपण,
स्त्री म्हणजे महान कार्य,
अशा या स्त्री शक्तीला मानाचा मुजरा……
आज ८ मार्च आज आपण येथे सर्वजण महिला दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत, सर्वप्रथम सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा……
छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवून स्वतंत्र स्वराज्य निर्माण करून देण्यासाठी केलेल्या संघर्षाचे दर्शन देणाऱ्या राजमाता जिजाऊ, “मे मेरी झाशी नही दूँगी” असे ठणकावून इंग्रजांशी संघर्ष करणारी राणी लक्ष्मीबाई आणि स्त्री शिक्षणाचे महत्त्व ओळखून मुलींना स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करून देणार्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या सर्व स्त्रियांच्या कार्याला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते.
या दिनाची खरी सुरुवात कधी झाली हे तुम्हाला माहिती आहे का?
तर या दिवसाची खरी सुरुवात स्रीयांच्या सामूहिक प्रयत्नांनी अमेरिकेत 1908 झाली. 8 मार्च 1960 मध्ये मध्ये कपड्याच्या कारखान्यात काम करत असलेल्या महिलांनी काम जास्त पण मजुरी कमी या कारणामुळे लढा पुकारला स्त्रियांनी संघटित होऊन स्वतःचा अधिकार मागण्यासाठी केलेला संघर्ष हा जगाच्या इतिहासातील पहिला संघर्ष मानला जातो.त्यानंतर 1910 साली सर्व महिला प्रतिनिधींसह कार्यकर्ते क्लारा झेटगी यांनी सुचवल्याप्रमाणे 8 मार्च या दिवसाला जागतिक महिला दिन म्हणून मान्यता मिळाली.
तुझ्या उत्तुंग भरारी पुढे,
गगनही ठेंगणे बसावे,
तुझ्या विशाल पंखाखाली,
विश्व ते सारे वसावे…
आज सर्वत्र जगभर महिला दिन साजरा होत आहे.
सर्व महिला आज हा सन्मानाचा अभिमानाचा दिवस उत्साहाने साजरा करत आहेत. आज सर्वत्र कर्तृत्ववान महिलांचे समाजात मोलाचे काम करणाऱ्या महिलांचे गृह उद्योग चालवणार्या महिलांचा सत्कार केला जातो. त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले जाते.
आज भारतातील स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती पथावर आहे शेतीतील मजुरा पासून ते देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत तसेच शिक्षिका,डॉक्टर,पोलीस, पोलीस निरीक्षक,तलाठी,ग्रामसेविका,पायलट,खेळाडू अशा अनेक क्षेत्रात महिलांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.
आपल्या भारत देशामधील अनेक महिलांनी विविध क्षेत्रात आपले नाव कमावले आहे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी,भारताचे राष्ट्रपती पदी निवड झालेल्या महिला प्रतिभाताई पाटील,भारतीय पोलिस सेवेत अधिकारी पदी असलेल्या किरण बेदी,भारतरत्न किताबाच्या मानकरी गानसम्राज्ञी लता मंगेशकर एक स्त्री म्हणून अशा या स्त्रियांचा गौरव सांगताना मला खूप अभिमान वाटत आहे.
सलाम या नारी शक्तीला प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असे म्हटले जाते हे सिद्ध करणारी अनेक उदाहरणे आपल्या समाजात आहे.स्त्री शिक्षणाचे महत्त्व ओळखून स्त्री शिक्षणाचा वारसा हाती घेतलेल्या महात्मा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी स्वतः शिकून वारसा चालवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षण घेताना त्यांची परीक्षा फी भरण्यासाठी त्यांची पत्नी रमाबाई यांनी कष्ट करून पैसे कमावले अशी अनेक उदाहरणे पुरुषांच्या देशांमध्ये स्त्रियांचा वाटा दर्शवतात.
आपल्या इतिहासात हिरकणी सारखी एकाही होऊन गेली ती स्वतःच्या बाळाच्या प्रेमापोटी रायगडाचा उभा कडा उतरून आली झाशीची राणी होऊन गेली जी बाळ पाठीवर बांधून लढली. त्यावरून स्त्री एका अगाध शक्तीचे रूप आहे हे समजते.
आज इथे सर्व स्त्री आनंदित आहे पण खरच ती स्वतंत्र झाली आहे का?
हा प्रश्न समाजाला विचारूनची वेळ आली आहे.आजही समाजात स्त्री असुरक्षित आहे, लैंगिक शोषण,अत्याचार या गोष्टींमुळे स्त्रियांचे मुलींचे जीवन धोक्यात येत आहे.
आजही समाजात मुलींना जन्म देताना विचार केला जातो मुलींचा तिरस्कार केला जातो. महिलांचा अपमान केला जातो.असा अत्याचार करणार्यांचे हे लक्षात ठेवले पाहिजे की, ती महिला कुणाचीतरी आई,बहीण किवा मुलगी आहे.
स्त्री पुरुष समानता ही समाजात आचरणात आणायला हवी प्रत्येक स्त्री ही समाजात स्वतःची ओळख निर्माण करीत आहे त्यांचे कार्यक्षेत्र विस्तारले आहे.आपण अशा स्त्रियांना प्रोत्साहन दिले पाहिजे. कुटुंबातील केवळ निर्णय तिच्यावर थोपविण्याऐवजी निर्णय घेण्यात तिला सामील करून घ्यायला हवे.
स्त्री सन्मानाची सुरुवात आपल्या घरापासूनच करायला हवी.तरच आपला भारत देश सुरक्षित,सक्षम आणि बलवान होईल.
शेवटी मी हेच म्हणू इच्छिते की,
तुझ्या प्रयत्नांना मिळूदे,यशाची सोनेरी किनार
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे, तुझा संसार
कर्तुत्व अन सामर्थ्याची ओढून घे नवीन झालर
स्री शक्तीचा होऊदे पुन्हा एकदा जागर
धन्यवाद…….