Table of Contents
माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी कला- उत्सव 2021
Kala Utsav 2021 for secondary and higher secondary level students
सन २०२१-२२ मध्ये केंद्र शासनाने कला उत्सवाच्या आयोजनामध्ये शास्त्रीय गायन, पारंपारिक गायन, शास्त्रीय संगीत वादन, पारंपारिक लोकसंगीत वादन, शास्त्रीय नृत्य, पारंपारिक लोकनृत्य, द्वीमितीय चित्र, त्रिमितीय चित्र/शिल्प व स्थानिक खेळणी तयार करणे या ९ कला प्रकारांचा समावेश केलेला आहे. त्यामुळे सन २०२१- २२ मध्ये राज्याच्या ९ कला प्रकारांचे ९ संघ राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या ऑनलाइन कला उत्सवासाठी १० डिसेंबर २०२१ पर्यंत नामनिर्देशित करावयाचे आहेत. राज्याच्या संघ निवडीसाठी वर नमूद कला प्रकारांमध्ये ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.
कला उत्सवामध्ये राज्यातील सर्व माध्यमाच्या,सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील ९ वी ते १२ वी मध्ये शिकणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. सर्व कला प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांचा वैयक्तिक (Solo) सहभाग असणार आहे. कला उत्सव स्पर्धेचे निकष सोबत जोडण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी या स्पर्धेबाबतच्या मार्गदर्शक सूचना http://www.kalautsav.in या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
1 विद्यार्थ्यांसाठी सूचना
- एक विद्यार्थी केवळ एका कला प्रकारातच सहभाग घेऊ शकतो.
- सहभागी स्पर्धकांनी सोबत जोडलेल्या निकषांचे वाचन करावे.
- कोणत्याही कला प्रकारच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तयारी केलेली असावी. व्यावसायिक कलाकारांचा सहभाग अथवा त्यांची मदत घेता येणार नाही,असे निदर्शनास आल्यास सदरील प्रवेशिका रद्द केली जाईल.
निकषात नमूद केल्यानुसार ४ ते ६ मिनिटांचा व्हिडीओ मोबाईल अथवा कॅमेराद्वारे तयार करावा.
2 कला- उत्सव विविध क्षेत्रे
- शास्त्रीय गायन
- पारंपारिक गायन
- शास्त्रीय संगीत वादन
- पारंपारिक लोकसंगीत वादन
- शास्त्रीय नृत्य
- पारंपरिक लोकनृत्य
- द्वीमितीय चित्र
- त्रिमितीय चित्र
- शिल्प व खेळणी
- व्हिडिओमधील चित्र व आवाजात स्पष्टता असावी. तयार केलेला व्हिडीओ व सोबत कला सादर करतानाचे ५ फोटो विद्यार्थ्यांने स्वतच्या/पालक/शिक्षकाच्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्वीटर किंवा यु-टूब अकाऊंट वरून #kalautsavmah2021 या हॅशटॅगचा वापर करून दि.१३ नोव्हेंबर २०२१ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पोस्ट करावा. व्हिडीओ पोस्ट करताना विद्यार्थ्यांने आपले नाव, इयत्ता, शाळेचा पत्ता, शाळेचा Udise क्रमांक, तालुका, जिल्हा, मेल आय. डी. संपर्क क्र. व भाग घेत असलेला कला प्रकार इ. उल्लेख करावा.
- पोस्ट Public असावी, ई- मेल पत्ता स्वत:चा नसेल तर पालक/शिक्षक यांचा ई -मेल वापरावा. फेसबुक, इंस्टाग्राम,ट्वीटर किंवा यु-टूब अकाऊंट वरून व्हिडीओ पोस्ट करताना प्राप्त झालेली कोणतीही एक लिंक copy करून ठेवावी.
- त्यानंतर विद्यार्थ्यांने आपली नोंदणी https://scertmaha.ac.in/kalautsav या पोर्टल जाऊन करावी.
Kala Utsav 2021 Registration NOW
——————–Kala Utsav 2021 —————
- नोंदणी मधील सर्व माहिती विद्यार्थ्यांने बिनचूक व पूर्ण भरावी. ही नोंदणी करताना फेसबुक,इंस्टाग्राम,ट्वीटर किंवा यु-टूब अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट करताना यापैकी प्राप्त झालेली कोणतीही एकच link नमूद केलेल्या ठिकाणी Paste करावी. एका स्पर्धेसाठी एका विद्यार्थ्यांची एकच पोस्ट असावी.
- आपल्या सादरीकरणाची पूर्ण जबाबदारी स्पर्धकाची असेल.
- एका वेळी एका पोस्टमध्ये एकाच विद्यार्थ्यांचे /पाल्याचे एकाच स्पर्धेचे साहित्य अपलोड करावे. एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे साहित्य अपलोड केल्यास/पोस्ट केल्यास सदर प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार नाही.
- विद्यार्थ्यांच्या /पाल्याच्या व्हिडीओ सादरीकरणामध्ये कोणताही चुकीचा आशय/आक्षेपार्ह विधान केले जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
- #kalautsavmah2021 हा हॅशटॅग लिहिताना अक्षरात कोठेही स्पेस देऊ नये, हॅशटॅगचे स्पेलिंग चुकवू नये.
3 जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्यासाठी सूचना
- जिल्ह्यातील सर्व पात्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी कला उत्सवामध्ये सहभागी व्हावे यासाठी प्राचार्य, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था व शिक्षणाधिकारी (माध्य.) यानी
- शाळा मुख्याध्यापकांसाठी संयुक्त सहीचे एक परिपत्रक त्वरीत निर्गमित करुन कला उत्सवाबाबतची माहिती आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना द्यावी.
- राज्यभरातून प्राप्त झालेली नामनिर्देशने व व्हिडीओ याची यादी राज्यस्तरावरून जिल्हानिहाय, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थाना दि.१५ नोव्हेंबर २०२१ रोजी पुरविले जाईल.
- प्राचार्य,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी जिल्ह्यातील प्राप्त नामनिर्देशनामधून योग्य विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी प्रत्येक कलाप्रकारनिहाय दोन परीक्षकांची एक निवड समिती जिल्हास्तरावर स्थापन करावी. (एकूण ९ कला प्रकार)
- दि.१७ व १८ नोव्हेंबर २०२१ रोजी (प्रवेशिकांच्या संख्येनुसार नुसार १/२ दिवस) राज्यस्तरावरून पुरविलेल्या व्हिडीओचे परीक्षण करून परीक्षकांनी जिल्हास्तरावर प्रत्येक कला प्रकारात सर्वोत्कृष्ट १ विद्यार्थी व १ विद्यार्थिनी अशा ९ कला प्रकारात १८ विद्यार्थ्यांची निवड ठरवून दिलेल्या निकषानुसार गुणदान करून करावी. (सोबत कला प्रकार निहाय निकष व गुणदान तक्ते जोडले आहेत.)
- मुंबई शहर व उपनगरामधील विद्यार्थी निवडीची प्रक्रिया प्राचार्य, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई यांनी करावी.
- जिल्हास्तरावरील कलाप्रकार निहाय सर्वोत्कृष्ट म्हणून निवडलेल्या मुलांची नावे या कार्यालयास दि. २३ नोव्हेंबर २०२१ रोजी संध्या. ५.०० पर्यंत कळवावी.
- जिल्हास्तरावरील परीक्षकांना मानधन रु.५००/ प्रतिदिन प्रस्तावित आहे. जिल्हास्तरावर सादिलवार खर्चासाठी रुपये १०००/- इतकी रक्कम प्रस्तावित आहे.
- जिल्हास्तरावरील खर्चाच्या सर्व पावत्या शिक्के मारून पूर्ण हिशोब तसेच उपयोगिता प्रमाणपत्र पोस्टाने या कार्यालयास दि. २५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत पाठविण्यात यावे.
- हिशोब प्राप्त झाल्यावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या खात्यावर सदर रक्कम वर्ग करण्यात येईल.
4 राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा
जिल्हास्तरावरून निवडण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट संघामधून राज्याच्या संघ निवडीसाठी प्राप्त नामनिर्देशने व व्हिडिओ यांची तपासणी राज्यस्तरीय तज्ञ समितीमार्फत करण्यात येईल. राज्यस्तरीय सादरीकरणातून प्रत्येक कलाप्रकारासाठी १ विद्यार्थी व १ विद्यार्थिनी अशा ९ कलाप्रकारामध्ये १८ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करून राष्ट्रीय स्तरावर त्यांची नामनिर्देशाने पाठविण्यात येतील. राज्यस्तरावरून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या स्पर्धकांना पुन्हा राज्यस्तरावर Online /प्रत्यक्ष सादरीकरण करावे लागेल, याबाबतची माहिती स्वतंत्रपणे कळविली जाईल. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा ह्या ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याने निवड झालेल्या विद्यार्थ्यांना याबाबतही स्वतंत्रपणे कळविले जाईल.
अधिक माहितीसाठी श्री. सचिन चव्हाण, उपविभाग प्रमुख मो.क्र.९६२३०२७४५३ व श्रीम.पद्मजा लामरुड, विषय सहायक, मो.क्र.९८२२०९६१०७ कला व क्रीडा विभाग या क्रमांकावर संपर्क साधावा.
5 कला उत्सवासाठी कला क्षेत्र
- संगीत
- नृत्य
- थिएटर
- व्हिज्युअल आर्ट्स (रेखाचित्र, चित्रकला, शिल्पकला, शिल्प)
6 कला उत्सवासाठी संघ
- संगीत 6-10 विद्यार्थी
- नृत्य 8-10 विद्यार्थी
- थिएटर 8-12 विद्यार्थी
- व्हिज्युअल आर्ट्स 4-6 विद्यार्थी
7 राष्ट्रीय स्तरावरील कला उत्सवातील पुरस्कार
- प्रथम पारितोषिक रु. 1,25,000/- प्रत्येकी
- द्वितीय पारितोषिक रु.75,000/- प्रत्येकी
- तृतीय पारितोषिक प्रत्येकी रु.50,000/-
कला उत्सव परिपत्रक
कला उत्सव स्पर्धा याद्या
TAG- kala utsav,kala utsav painting,kala utsav 2020-21,kala utsav 2021 registration,kala utsav 2021 22,kala utsav 2020,kala utsav drawing,kala utsav is an initiative of,kala utsav 2021 held in,kala utsav meaning