“लेटस चेंज” हा चित्रपट राज्यातील शाळांमधून दाखविण्यास परवानगी
श्री. समर्थ फिल्मस, नवी मुंबई “लेट्स चेंज” या मराठी चित्रपटास राज्यातील शाळांमधून दाखविण्यास परवानगी देण्यात यावी अशी संदर्भाधीन दिनांक १३/०३/२०२३ च्या पत्रान्वये विनंती केलेली आहे. सदर मराठी चित्रपटास राज्यातील शाळांमधील विद्यार्थी/विद्यार्थीनींना दाखविण्यास खालील अटी व शर्तीच्या आधीन राहून शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४ व २०२४-२५ या दोन वर्षापुरती परवानगी देण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील इतर तालुके आणि जिल्ह्यांमध्ये हा चित्रपट अद्याप इयत्ता 6 वी ते 8 वी च्या 100% विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला नसेल, तर हे लक्षात घेऊन आम्ही या माध्यमातून ही लिंक विद्यार्थ्यांना देत आहोत. मात्र, या लिंकद्वारे आम्ही आमच्या शाळेतील विद्यार्थी आणि पालकांनाही ही लिंक देत आहोत, जेणेकरून त्यांना त्यांच्या पालकांच्या मोबाईल फोनवर सोयीनुसार हा चित्रपट त्यांच्या पालकांसोबत घरी पाहता येईल.
100% विद्यार्थ्यांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर, या माध्यमातून विद्यार्थी स्वच्छता मॉनिटर म्हणून त्यांची भूमिका प्रभावीपणे बजावू शकतील.
“लेटस चेंज” हा चित्रपट अटी:
१) सदर चित्रपट पाहण्याची कोणत्याही विद्यार्थ्यांना सक्ती करण्यात येणार नाही.
२) विद्यार्थ्याच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात कोणताही अडथळा येणार नाही याची योग्य ती दक्षता घेण्यात यावी.
३) या शासन परवानगीच्या आधारे सदर चित्रपट दाखविण्याबाबत इतर दुसऱ्या कोणत्याही संस्थेबरोबर निर्माता श्री समर्थ फिल्मस, नवी मुंबई यांना करार करता येणार नाही, किंवा प्रतिनिधी नेमता येणार नाहीत व तशी परवानगी त्यांना राहणार नाही.
४) सदरहू चित्रपट पहाण्यास इच्छुक विद्यार्थ्यांकडून रुपये २०/- (रुपये वीस फक्त) पेक्षा जास्त मुल्य आकारता येणार नाही.
५) हा चित्रपट शाळांमधून दाखविताना कोणत्याही प्रकारचा वाद उद्धभवल्यास किंवा तक्रारी प्राप्त झाल्यास सदर संस्थेस दिलेली परवानगी तात्काळ रद्द करण्यात येईल.
६) सदरील सिनेमा केंद्र सरकाच्या “स्वच्छ भारत मिशन” वर आधारीत असल्यामुळे शाळेतील सर्व मुलांना चित्रपट पाहण्यासाठी प्रोत्साहित करावे.
७) सदरिल चित्रपट हा केंद्र सरकारच्या “स्वच्छ भारत मिशन” वर आधारित असल्याने शाळांमध्ये चित्रपट दाखवल्याचा अहवाल जिल्हा संयोजकांमार्फत शिक्षण विभागाला सादर करावा.
८) सदर चित्रपट दाखविण्याची परवानगी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ व २०२४-२५ पुरतीच मर्यादित राहील.
९) शालेय स्वच्छता भारत अभियानाची अमलबजावणी करण्यासाठी दि. ७ ऑक्टोबर, २०१५ च्या निर्णयान्वये “स्वच्छ विद्यालय स्वच्छ महाराष्ट्र” या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याविषयी सूचना देण्यात आलेल्या आहेत. सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्र. ४.६ पालकांना व विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व समजून सांगण्यासाठी संगणकावर फिल्म / क्लीप दाखवणे व ४.८ नुसार दर आठवड्याला प्रत्येक वर्गासाठी कार्यानुभवाचा एक तासिका स्वच्छता कार्यक्रमाकरिता वापरण्यात यावी अशाही सूचना दिलेल्या आहेत. विषयाधिन शैक्षणिक चित्रपट हा स्वच्छतेशी संबंधित असल्यामुळे वरील अटींच्या अधीन राहून चित्रपट दाखवावयाचा असल्यास सदर तासिकेचा वापर करण्यात यावा.
संदर्भ – शासन निर्णय संकेताक २०२३०४१११४४७०८५९२१
let’s change movie,let’s change movie summary,let’s switch movie,let’s change full movie download,let’s move it meaning,let’s make a change meaning,let’s make a movie meaning,let’s go to the movies meaning,let’s change movie summary,change places movie