महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा TET २०२१ उत्तरसूची जाहीर
Maharashtra TET Answer Key pdf 2021
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद महाराष्ट्र शिक्षक पात्रता (MahaTET) – २०२१ अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार दिनांक २१ नोव्हेंबर २०२१ रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्र. १ पेपर क्र.२ ची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात येत आहे.
या परीक्षेच्या पेपर क्र.१ व पेपर क्र.२ बाबत प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किवा पर्यायो उत्तराबाबत त्रुटी आक्षेप असल्यास ते परीक्षा परिषदेकडे दि.०८ १२ २०२१ अखरपर्यंत पाठवता येतील सदर आक्षेप त्रुटो बाबतचे निवेदन https://mahatet.in/ या संकेतस्थळावर परीक्षार्थ्याच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आक्षेप नोंदणी या लिकद्वारे परिषदेकडे पाठविता येतील. आक्षेपाबाबत लेखी निवेदन समक्ष टपालाने इमेलद्वारे पाविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही.
Maha TET Answer Key 2021 : 21 नोव्हेंबर 2021 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (MSCE) पुणे यांनी महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपर 1 आणि पेपर 2 यशस्वीरित्या पार पाडली. यामध्ये इयत्ता पहिली ते पाचवीच्या शिक्षकांसाठी महा टीईटी पेपर 1 आणि इयत्ता सहावी ते आठवीच्या शिक्षकांसाठी पेपर 2 मध्ये, अनेक अर्जदारांनी अर्ज केले होते.
MSCE पुणे ने पेपर १ आणि पेपर 2 साठी महाराष्ट्र TET Answer Key ची PDF जाहीर केली आहे. अधिकृत वेबसाइटवरील महाराष्ट्र TET परीक्षेची उत्तरपत्रिका PDF 2021 बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक्सचा वापर करावा.महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा Maha-TET 2021 चा निकाल लागण्यापूर्वी उमेदवार त्यांची TET Answer Key 2021 ची उत्तरसूची बघून आणि अंदाज लावून त्यांच्या गुणांची पडताळणी करू शकतात.
अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची
[wptb id=33144]
उमेदवार केवळ महा टीईटी पेपर २ च्या अंतिम उत्तरसूचित मुख्य विषयाच्या आधारे त्यांच्या निवडीचा अंदाज लावू शकतात. तात्पुरत्या उत्तरसूची वरील आक्षेपांचे निराकरण झाल्यावर MSCE महा टीईटी अंतिम उत्तर सूची जारी करतील.
[wptb id=33141]