महात्मा गांधीजींचे भाषण मराठीत | Mahatma Gandhi’s speech in Marathi
आदरणीय व्यासपीठ ईश्वर गुरुजन वर्ग आणि माझ्या बाल मित्रांनो मी (तुमचे नाव) आज मी येथे अशा एका महान व्यक्ती ची गाथा उघडणार आहे याचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे.
दे दी हमे आजादी
बिना खड्ग बिना ढाल
साबरमती के संत
तुने कर दिया कमाल
हे वाक्य ऐकल्याबरोबर तुमच्या लक्षात आलेच असेल की मी इथे कोणाविषयी बोलणार आहे मित्रांनो, आज आपण येथे महात्मा गांधी यांची 153 वी जयंती साजरी करण्यासाठी जमलो आहोत त्यानिमित्ताने मी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विषयी दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही विनंती
भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 गुजरात मधील पोरबंदर या गावी एका सुसंस्कृत व प्रतिष्ठित कुटुंबात झाला त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते त्यांच्या आईचे नाव पुतळीबाई होते बालपणी त्यांची आई त्यांना धार्मिक कथा सांगून सदाचरण याचे महत्त्व त्यांच्या मनावर बिंबविले त्यांना रामायण-महाभारत वाचायला सांगत गांधीजींनाही वाचनाची आवड होती त्यांना गोष्टी वाचायला आवडत असे आणि त्या गोष्टी त्यांच्या मनावर खोलवर परिणामही करत असत.
महात्मा गांधीचे सर्वात जुने फोटो, तुम्ही बघितले का?
गांधीजी चे वडील प्रथम पोरबंदर संस्थांचे व नंतर राजकोट संस्थानचे दिवाण होते त्यामुळे गांधीजींचे प्राथमिक शिक्षण पोरबंदर येथे आणि माध्यमिक शिक्षण राजकोट येथे पूर्ण झाले त्यानंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी ते इंग्लंडला गेले तेथून त्यांनी बॅरिस्टरची पदवी घेतली व वकिली करू लागले परदेशात वकिली करत असतानाच काळे-गोरे जनमानसात लाभेल दिसून आला रेल्वेच्या प्रवासात त्यांना भयानक गोष्टीला सामोरे जावे लागले.
रेल्वेच्या कोणत्या वर्गात काळाने बसायचे हे गोरे इंग्रज ठरवायचे गोरे इंग्रज वर्णाने काळे असणाऱ्या लोकांवर अन्याय अत्याचार करीत त्यांना गुलामासारखे वागवत या अनुभवाने प्रेरित होऊन शांततेचे व समतेचे उपासक असणाऱ्या गांधीजींनी अहिंसेच्या मार्गाने इंग्रजांविरुद्ध लढण्याचा निश्चय केला.
इंग्रजांच्या काळात त्या वेळी काही भारतीयांना अन्न, वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजाही मिळत नव्हत्या गांधीजींना जनतेच्या हालअपेष्टा पहावल्या नाही. त्यांना इंग्रजांच्या या अन्यायी जुलमी सत्तेची प्रचंड चिडली जनतेला या मूलभूत गरजा मिळाव्यात तसेच भारतातील ही गरिबी उच्चनीच भेदभाव अंधश्रद्धा नष्ट व्हावी म्हणून त्यांनी योग्य ती पावले उचलली इंग्रजांविरुद्ध अनेक आंदोलने छेडली अनेक सत्याग्रह केले तसेच त्यांनी इंग्रजांच्या जुलमी कारभाराचा निषेध करत परकीय सत्तेला देशातून हाकलून देण्यासाठी सत्य, अहिंसा, सत्याग्रह, स्वदेशी चा वापर तसेच उपोषण व हरताळ यासारख्या सूत्रांचा वापर केला.
वेळप्रसंगी गोळ्यांचा लाठीमारही त्यांनी सहन केला चलेजाव चळवळ दांडीयात्रा आमरण उपोषण या विधायक मार्गांचा वापर करून त्यांनी आपल्या देशाला सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळून दिले यासाठी अनेक महापुरुषांनी आपापल्या मार्गाने देशासाठी खूप मोठे योगदान दिले त्यात महात्मा गांधींचा सिंहाचा वाटा होता.
अतिशय साधी राहणी व उच्च विचारसरणी असणार्या एका भारतीयाने संपूर्ण जगाला शांतता व समतेचा उपदेश दिला त्यांच्या साध्या राहणी आणि उच्च विचारांचे भारून जनता त्यांना महात्मा, राष्ट्रपिता, बापूजी म्हणू लागली शांततेच्या मार्गाने लढा देणारे असे थोर महापुरुष आपल्या देशाला लाभले हे आपणा सर्वांचे परम भाग्य आहे.अशा या थोर महापुरुषाला माझे कोटी कोटी प्रणाम….
एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपविते.
जय हिंद जय भारत…………………………….. धन्यवाद