शाळा प्रवेशासाठी २०२२-२३ या शैक्षणिक सत्रात बालकाचे किमान वय निश्चित
शासन निर्णयाच्या अनुषंगाने सन २०२२-२३ या शैक्षणिक सत्रात शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत खालील प्रमाणे सुचना देण्यात येत आहे. शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दिनांक १८/०९/२०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये मानीव दिनांक ३१ डिसेंबर करण्यात आला आहे. त्यामुळे ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यातील जन्म असलेल्या बालकांच्या प्रवेशाबाबत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये अडचणी निर्माण होत आहे. म्हणून मानिव दिनांक बदलामुळे य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ साठी किमान वयोमर्यादा माहे ३१ डिसेंबर २०२२ अखेर पुढील प्रमाणे वय असणे आवश्यक आहे.
पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेशाच्या वयाबाबत लवचिकता आहे, किती वर्षासाठी पूर्व प्राथमिक शिक्षण घ्यावे, कोणत्या वयामध्ये प्रवेश घ्यावा व कोणत्या वर्गात प्रवेश घ्यावा हे सर्वस्वी पालकांच्या इच्छेवर अवलंबून आहे. शाळांनी पूर्व प्राथमिक साठी कमी-जास्त वयाचे कारण देवून प्रवेश नाकारणे अपेक्षित नाही. सदरील शासन निर्णय दिनांक १८/०९/२०२० मुख्यतः इयत्ता १ ली मध्ये प्रवेशासाठी लागू आहे. शासनाने उक्त शासन निर्णयानुसार किमान वयोमर्यादा निश्चित करुन दिलेली आहे. कमाल वयोमर्यादा निश्चित केलेली नाही. कमाल वयोमर्यादेमध्ये लवचिकता ठेवण्यास हरकत नाही.
The minimum age of a child for school admission is fixed in the academic session 2022-23
In accordance with the ruling, the following instructions are being given regarding fixing the minimum age of the child for school admission in the academic session of the year 2022-23. As per the government decision dated 18/09/2020 regarding fixing the minimum age of a child for school admission, it has been fixed as 31st December. Therefore, there are difficulties in the admission of children born in the months of October, November and December in the academic year 2022-23. Therefore, the minimum age limit for the academic year 2022-23 should be 31 December 2022 at the end of the year so as not to cause any educational loss to the students due to the change in human date.
There is flexibility regarding the age of admission for pre-primary education, how many years to take pre-primary education, at what age to get admission and in which class to take admission all depends on the wishes of the parents. Schools are not expected to deny admission for pre-primary on the grounds of age. This ruling dated 18/09/2020 is mainly applicable for admission in class I. The government has fixed the minimum age limit as per the aforesaid ruling. Maximum age limit not specified. There is no problem in keeping flexibility in the maximum age limit.