राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण – २०२१ | NATIONAL ACHIEVEMENT SURVEY-2021
भारत सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) दिल्ली, CBSE बोर्ड व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने संपूर्ण राज्यात एकाच दिवशी राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण चाचणी घेण्यात येणार आहे.
- चाचणी दिनांक १२ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १०.३० ते १२.३० या कालावधीत सर्व्हेक्षणमध्ये निवडण्यात आलेल्या शाळेमध्येच घेण्यात येणार आहे.
- निवडलेल्या शाळांची यादी व निवडलेले वर्ग NAS CBSE CELL व SCERT (SNO) पुणे कडून प्राप्त होताच कळविण्यात येईल.
- राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण चाचणी इयत्ता ३ री, ५ वी, ८ वी व १० वी साठी घेण्यात येणार असून निवडलेल्या वर्गातील CBSE च्या सूचनानुसार एकूण पट ३० पेक्षा जास्त असल्यास एकूण पटापैकी ३० विद्यार्थ्यांची निवड करून तेवढयाच विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात येणार आहे.
- तसेच वर्गातील विद्यार्थी पटसंख्या ३० पेक्षा कमी असल्यास सर्व विद्यार्थांची चाचणी घेण्यात येणार आहे.
चाचणीचे स्वरूप खालीलप्रमाणे
शाळा मुख्याध्यापकांना परीक्षा कामकाजासंबंधी खालील सूचना
१. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात निवड झालेल्या शाळेचा सहभाग अनिवार्य आहे.
२. दिनांक १२ नोव्हेंबर २०२१ रोजी निवडलेल्या शाळेतील मुख्याध्यापक सर्व शिक्षक व सर्व विद्यार्थी १००% उपस्थित ठेवावेत.
3.सदर चाचणी पूर्वकामकाजासाठी शाळाभेटी साठी आलेल्या क्षेत्रीय अन्वेषकांना सर्वेक्षणासाठी आवश्यक ती माहिती उपलब्ध करून देण्यात यावी.
4.चाचणीच्या दिवशी परीक्षा आयोजनासाठी भौतिक सुविधा/वर्गखोली इ. अनुषंगिक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.
५. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर परीक्षा कामकाज होत असलेने कोविड-१९ चे सर्व नियम पाळून परीक्षा कामकाज सुरळीतपणे पूर्ण होण्यास सहकार्य करावे.
६. चाचणीच्या दिवशी शाळेमध्ये क्षेत्रीय अन्वेषक (F.I.), निरीक्षक (Observer) व चाचणी कामकाजाचे पाहणी करण्यासाठी भेट देणारे अधिकारी येतील त्यांना आवश्यक सहकार्य करावे.
७. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण संबंधी कामकाज सदर शाळेमध्ये सकाळी ८.०० ते ३.०० वाजेपर्यंत चालणार आहे.
८. अधिक माहितीसाठी https://nas.education.gov.in या संकेतस्थळावर भेट देण्यात यावी.
राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण चाचणी प्रश्नसंच | प्रश्नपत्रिका
National ACHIEVEMENT Survey Test Questionnaire | Question paper
इयत्ता | प्रश्नसंच लिंक |
---|---|
इ १ ली | डाऊनलोड प्रश्नसंच |
इ.२ री | डाऊनलोड प्रश्नसंच |
इ.३ री | डाऊनलोड प्रश्नसंच |
इ.४ थी | डाऊनलोड प्रश्नसंच |
इ.५ वी | डाऊनलोड प्रश्नसंच |
इ.६ वी | डाऊनलोड प्रश्नसंच |
इ.७ वी | डाऊनलोड प्रश्नसंच |
इ.८ वी | डाऊनलोड प्रश्नसंच |
Popular इ ३ री
Free | इ ५ वी
Free Popular | Popular इ ८ वी
Free |
TAG-national achievement survey,national achievement survey 2021 pdf,national achievement survey achievement test class 8,national achievement survey class 10,national achievement survey 2020,national achievement survey pdf,national achievement survey 2021 form download