• About us
  • Privacy Policy
  • Contact us
  • Disclaimer
  • Login
  • Register
Thakare Blog
  • Home
  • शिक्षक कट्टाT
  • विद्यार्थी कट्टा
  • Online शाळा
    • Courses
    • New registration
    • Login & Logout
    • Your Profiles
    • Edit Profile
No Result
View All Result
  • Home
  • शिक्षक कट्टाT
  • विद्यार्थी कट्टा
  • Online शाळा
    • Courses
    • New registration
    • Login & Logout
    • Your Profiles
    • Edit Profile
No Result
View All Result
Thakare Blog
No Result
View All Result
ADVERTISEMENT
Home विद्यार्थी कट्टा

मुदतवाढ -राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTS) इ. १० वी साठी २०२१-२२

NATIONAL TALENT SEARCH EXAMINATION (2021-22)

thakareblog by thakareblog
19/04/2022
in विद्यार्थी कट्टा, शिक्षक कट्टा, शैक्षणिक सूचना
18 1
0
मुदतवाढ -राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTS) इ. १० वी साठी २०२१-२२
47
SHARES
939
VIEWS
ADVERTISEMENT

Table of Contents

  • 1. अर्ज करण्याची पध्दत
  • 2. राज्याचा राष्ट्रीयस्तर परीक्षेसाठी कोटा
  • 3. निकाल घोषित करणे 

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTS) इ. १० वी साठी २०२१-२२

NATIONAL TALENT SEARCH EXAMINATION (2021-22)

 

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा योजना ही राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT), नवी दिल्ली यांचेमार्फत राबविली जाते. प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपसना करणे हा या योजनेचा गाभा आहे. प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते. मूलभूत विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि वाणिज्य यामधील पीएच.डी. (विद्यावाचस्पती) पदवी प्राप्त करेपर्यंत सदर शिष्यवृत्ती मिळते. अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन आणि विधी यामधील व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सदर शिष्यवृत्ती फक्त पदव्युत्तर पदवीपर्यंत देण्यात येते. निवड वर्ष २०१२-१३ पासून राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTS) इ. १० वी साठी करण्यात आली आहे.

सन २०२१-२२ साठी राज्यस्तर राष्ट्रीय प्रज्ञाशोध (NTS) परीक्षा दि. १६ जानेवारी २०२२ रोजी घेण्यात येणार होती, तथापि NCERT, नवी दिल्ली यांचे सूचनेनुसार काही प्रशासकीय कारणास्तव सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे सदर परीक्षेसाठी ऑनलाईन शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व https://www.ntsemsce.in या संकेतस्थळावर भरण्यासाठीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

NTS NEW Update Thakare Blog

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-१ यांचेमार्फत राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTS) इ. १० वी साठी राज्यस्तर परीक्षा रविवार दि. १६ जानेवारी २०२२ रोजी घेण्यात येणार होती परंतु काही प्रशासकीय कारणास्तव सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.राष्ट्रीय प्रज्ञाशोध (NTS) परीक्षेची दिनांक NCERT नवी दिल्ली यांचेकडून प्राप्त झाल्यानंतर यथावकाश परिषदेच्या संकेतस्थळावरुन जाहीर करण्यात येईल.

शिष्यवृत्ती संख्या

भारत देशात इ. १० वी या इयत्तेसाठी परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे २००० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या प्रदान करण्यात येतात.

शिष्यवृत्तीची रक्कम:- राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT), नवी दिल्ली यांच्या नियमांच्या अधिन राहून प्रत्येक शिष्यवृत्ती धारकास खालीलप्रमाणे शिष्यवृत्ती दिली जाते.

national talent search examination,national talent search examination 2022,national talent search examination syllabus,national talent search examination result,national talent search examination question paper,national talent search examination eligibility
national talent search examination,national talent search examination 2022,national talent search examination syllabus,national talent search examination result,national talent search examination question paper,national talent search examination eligibility 

आरक्षण

अनुसूचित जातींसाठी (SC) १५% शिष्यवृत्त्या, अनुसूचित जमातींसाठी (ST) ७.५% शिष्यवृत्त्या, सन २०१८-१९ पासून http://www.ncbc.nic.in/user_panel/centralliststateview.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या केंद्रीय सूचीनुसार (Non-creamy layer) इतर मागास संवर्गासाठी (OBC) २७% शिष्यवृत्त्या आणि सन २०१९-२० पासून EWS (Economically Weaker Section) घटकातील विद्यार्थ्यांसाठी १०% शिष्यवृत्त्या राखून ठेवण्यात आलेल्या आहेत. तसेच दिव्यांगांसाठी ४% आरक्षण प्रत्येक संवर्गात लागू करण्यात आले आहे. (a), (b), and (c) प्रत्येकी १% आरक्षण व (d), (e) या साठी १% आरक्षण प्रत्येक संवर्गात लागू करण्यात आले आहे.

  • (a) Blindness and low vision : (BLV)
  • (b) Deaf and hard of hearing : (DH)
  • (c) Locomotors disability including cerebral palsy, leprosy cured, dwarfism, acid attack victims and muscular dystrophy : (LD)
  • (d) Autism, intellectual disability, ific rning lity and mental illness : (AID)
  • (e) Multiple disabilities from amongst persons under clauses (a) to (d) including deaf blindness in the posts identified for each disabilities : (DH)
हे वाचले का ? -  जलप्रदूषणाच्या समस्येचे गांभीर्य आणि पाण्याच्या सुरक्षिततेचा अभ्यास(जलसुरक्षा)

आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी सादर करावयाचे प्रमाणपत्र 

  1. a) अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) च्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र upload करणे आवश्यक आहे.
  2. b) http://www.ncbc.nic.in/user_panel/centralliststateview.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या केंद्रीय सूचीनुसार इतर मागास संवर्ग (OBC) च्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे व Non-creamy layer प्रमाणपत्र upload करणे आवश्यक आहे.
  3. c) भारत सरकार यांचे ३६०३९/१/२०१९-Estt (Res) दि. ३१ जानेवारी २०१९ च्या अधिसूचनेनुसार Economically Weaker Section (EWS) च्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याचे EWS प्रमाणपत्र upload करणे आवश्यक आहे.
  4. d) दिव्यांग आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याचे दिव्यांग प्रमाणपत्र upload करणे आवश्यक आहे.

वरीलप्रमाणे विद्यार्थ्याचे जातीचे प्रमाणपत्र, EWS प्रमाणपत्र, Non-creamy layer प्रमाणपत्र व दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र परिषदेच्या संकेतस्थळावर शाळा लॉगिन करुन दि. १३ डिसेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन upload करावयाची आहेत व तसेच सक्षम अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीची आरक्षणाचा लाभ घेण्यासाठीची आवश्यक प्रमाणपत्रे परीक्षेच्या दिवशी केंद्रसंचालकांकडे जमा करणे बंधनकारक आहे. ज्या विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे विहित मुदतीत ऑनलाईन upload केली जाणार नाहीत तसेच परीक्षेच्या दिवशी केंद्रसंचालकांकडे जमा केली जाणार नाहीत अशा विद्यार्थ्यांना सर्वसाधारण संवर्ग (General category) म्हणून गृहीत धरले जाईल व सदर विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ दिला जाणार नाही.

विद्यार्थ्यांची निवड

विद्यार्थ्यांची निवड दोन स्तरावर करण्यात येईल.

  1. a) प्रथमस्तर (राज्यस्तर) :- संबंधित राज्यस्तर/केंद्रशासित प्रदेशाच्या लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड राष्ट्रीय स्तरासाठी करण्यात येईल.
  2. b) द्वितीयस्तर (राष्ट्रीयस्तर):- प्रथमस्तर (राज्यस्तर) परीक्षेतून यशस्वी झालेले विद्यार्थी द्वितीयस्तर (राष्ट्रीयस्तर) परीक्षेसाठी बसू शकतील. सदर परीक्षा NCERT नवी दिल्ली यांचेमार्फत घेण्यात येते.

पात्रता गुण 

MAT व SAT विषयासाठी प्रत्येक विषयात स्वतंत्रपणे General संवर्गासाठी ४०% गुण व SC, ST व दिव्यांगासाठी ३२% गुण आवश्यक आहेत.

शुल्क :- राज्यस्तर परीक्षेसाठी खालीलप्रमाणे शुल्क आकारण्यात येते. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT), नवी दिल्ली यांचेमार्फत घेण्यात येणाऱ्या द्वितीयस्तर (राष्ट्रीयस्तर) परीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही.

हे वाचले का ? -  11 वी प्रवेश CET परीक्षेसाठी online फॉर्म भरण्याची सुरवात  

NTS Update Thakare Blog

परीक्षेच्या तारखा

राष्ट्रीय प्रज्ञाशोध (NTS) परीक्षेची दिनांक NCERT नवी दिल्ली यांचेकडून प्राप्त झाल्यानंतर यथावकाश परिषदेच्या संकेतस्थळावरुन जाहीर करण्यात येईल.

पात्रता 

  1. a) महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासनमान्य शाळेतील इयत्ता १० वी मध्ये शिकत असलेल्या नियमित विद्यार्थी/विद्यार्थीनीस राज्यस्तर परीक्षेस बसता येते. त्यासाठी वयाची, उत्पन्नाची अगर किमान गुणांची अट नाही. तसेच कोणतीही पूर्व परीक्षा देण्याची अट नाही.
  2. b) ओपन डीस्टन्स लर्निंग (ODL) स्कूल योजनेखाली नोंदविलेले खालील अटी पूर्ण करणारे विद्यार्थीही या परीक्षेसाठी पात्र ठरतात.
  • १ जुलै २०२१ रोजी ज्यांचे वय १८ पेक्षा कमी आहे.
  • जे नोकरी करीत नाहीत.
  • जे इ. १० वी च्या परीक्षेला पहिल्यांदाच बसत आहेत.

राज्यस्तरीय परीक्षेचे विषय व वेळापत्रक

लेखी परीक्षेचे स्वरुप खालीलप्रमाणे असेल.

  1. A) प्रथमस्तर (राज्यस्तर) परीक्षा :

    national talent search examination,national talent search examination 2022,national talent search examination syllabus,national talent search examination result,national talent search examination question paper,national talent search examination eligibility
    national talent search examination,national talent search examination 2022,national talent search examination syllabus,national talent search examination result,national talent search examination question paper,national talent search examination eligibility
  • अ) पेपर – १ ला :- बौध्दिक क्षमता चाचणी (MAT)ही मानसशास्त्रीय चाचणी असून, त्यामध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित १०० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतील. (एकूण १०० गुण)
  • ब) पेपर – २ रा :- शालेय क्षमता चाचणी ही सामान्यत: ९ वी व १० वीच्या अभ्यासक्रमांवर आधारित असेल. त्यामध्ये १) सामान्य विज्ञान २) समाजशास्त्र ३) गणित असे तीन विषय असतील. या तीन विषयांचे एकण १०० प्रश्न सोडवायचे असतात.

सामान्य विज्ञान ४० गुण + समाजशास्त्र ४० गुण + गणित व भूमिती २० गुण = एकूण १०० गुण

उपविषयावर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल. –

  • सामान्य विज्ञान ४० गुण :- भौतिकशास्त्र १३ गुण, रसायनशास्त्र १३ गुण व जीवशास्त्र १४ गुण.
  • सामाजिक शास्त्र ४० गुण :- इतिहास १६ गुण, राज्यशास्त्र ०८ गुण व भूगोल १६ गुण.
  • गणित २० गुण :- बिजगणित १० गुण व भूमिती १० गुण.
  1. B) द्वित्तीय (राष्ट्रीयस्तर) परीक्षा :- राज्यस्तर परीक्षेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीयस्तर परीक्षेबाबत NCERT नवी दिल्ली यांचेमार्फत परस्पर कळविले जाईल.

1 अर्ज करण्याची पध्दत

ऑनलाईन आवेदनपत्र भरताना विद्यार्थ्याच्या जातीचे प्रमाणपत्र, केंद्रीय सूचीनुसार इतर मागास संवर्गातील (OBC) विद्यार्थ्यांची Non-creamy layer प्रमाणपत्र, EWS (Economically Weaker Section) प्रमाणपत्र व दिव्यांगत्व प्रमाणपत्राची खात्री करुनच जात व दिव्यांगत्वाची माहिती भरावी. मुख्याध्यापक व विद्यार्थ्याचा पासपोर्ट साईज फोटो व स्वाक्षरी ऑनलाईन आवेदनपत्र भरताना स्कॅन (Scan) करुन अपलोड करणे आवश्यक आहे. अपूर्ण भरलेले आवेदनपत्रे संगणक स्विकृत करणार नाही. तसेच ऑनलाईन भरलेल्या विद्यार्थ्याच्या आवेदनपत्रात काही दुरुस्ती असल्यास सदरची दुरुस्ती दि. १३ डिसेंबर २०२१ पर्यंत करता येईल. याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांची असेल. सविस्तर माहिती परिषदेच्या www.mscepune.in व http://nts.mscescholarshipexam.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

2 राज्याचा राष्ट्रीयस्तर परीक्षेसाठी कोटा

द्वितीयस्तर (राष्ट्रीयस्तर) परीक्षेसाठी प्रत्येक राज्याच्या प्रथमस्तर (राज्यस्तर) परीक्षेतून गुणानुक्रमे निवड करावयाची विद्यार्थी संख्या ठरवून देण्यात आली आहे. गत वर्षी महाराष्ट्रासाठी हा कोटा ७७४ विद्यार्थी संख्या इतका होता. द्वितीयस्तर (राष्ट्रीयस्तर) परीक्षेतून अंतिम शिष्यवृत्तीधारक निवडताना राज्य/केंद्रशासित प्रदेश यांचा हिस्सा (कोटा) ठेवण्यात आलेला नाही.

3 निकाल घोषित करणे 

प्रथमस्तर (राज्यस्तर) परीक्षेचा निकाल साधारण मार्च २०२२ च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. सदर परीक्षेचा निकाल व निवडयादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध केली जाईल. जिल्ह्यांनी, शाळांनी व विद्यार्थ्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरुनच प्राप्त करुन घ्यावयाचा आहे.

परदेशात शिकणारे भारतीय विद्यार्थी :- परदेशात शिकणारे भारतीय विद्यार्थी इ. १० वी व समकक्ष इयत्तेत शिकत असतील तर प्रथमस्तर (राज्यस्तर) परीक्षेला न बसता थेट द्वितीयस्तर (राष्ट्रीयस्तर) परीक्षेस बसू शकतात. त्यासाठी विद्यार्थ्याने NCERT नवी दिल्ली यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीप्रमाणे आवश्यक पत्रव्यवहार करुन संगणकावरुन घेतलेले आवेदनपत्र सादर करावे. सदर आवेदनपत्रासोबत त्याच्या मागील वर्षीच्या गुणपत्राची सत्यप्रत जोडून ते दि. २८ फेब्रुवारी २०२२ पूर्वी NCERT नवी दिल्ली यांचेकडे सादर करणे आवश्यक आहे.

 

Tags: national talent search examinationnational talent search examination 2022national talent search examination eligibilityराष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा अभ्यासक्रमराष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा माहिती

Get real time update about this post categories directly on your device, subscribe now.

Unsubscribe
ADVERTISEMENT
Previous Post

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण मराठी

Next Post

शिष्यवृत्ती परीक्षा इ. ५ वी व इ. ८ वी-२०२२ साठी व्दितीय मुदतवाढ | शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक

thakareblog

thakareblog

Related Posts

“अविरत टप्पा ४ “प्रशिक्षणाकरीता तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे ऑनलाईन प्रशिक्षण
प्रशिक्षण

“अविरत टप्पा ४ “प्रशिक्षणाकरीता तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे ऑनलाईन प्रशिक्षण

18/01/2023
595
सावित्रीबाई फुले निबंध मराठी
All Update's

सावित्रीबाई फुले निबंध मराठी

03/01/2023
3.5k
NMMS Exam 2022-23 | National Scholarship Scheme for Economically Weaker Students
All Update's

NMMS Exam 2022-23 | National Scholarship Scheme for Economically Weaker Students

10/10/2022
1.7k
महात्मा गांधीचे सर्वात जुने फोटो, तुम्ही बघितले का?
All Update's

महात्मा गांधीजींचे भाषण मराठीत | Mahatma Gandhi’s speech in Marathi

29/09/2022
1.9k
वाचन प्रेरणा दिनानिमित्त free online books
All Update's

वाचन प्रेरणा दिनानिमित्त free online books

27/09/2022
410
हिंदी दिवस का जबरदस्त भाषण
All Update's

हिंदी दिवस का जबरदस्त भाषण

14/09/2022
1.1k
Next Post
शिष्यवृत्ती परीक्षा इ. ५ वी व इ. ८ वी-२०२२ साठी व्दितीय मुदतवाढ | शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक

शिष्यवृत्ती परीक्षा इ. ५ वी व इ. ८ वी-२०२२ साठी व्दितीय मुदतवाढ | शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87k Followers
  • 23.7k Followers
  • 99 Subscribers
ADVERTISEMENT
  • Trending
  • Comments
  • Latest
दहावीचा निकाल 16 जुलैला होणार जाहीर

दहावीचा निकाल 16 जुलैला होणार जाहीर

17/07/2021
11 वी प्रवेश CET परीक्षेसाठी online फॉर्म भरण्याची सुरवात  

११ वी सामाईक प्रवेश परीक्षा परीक्षा नोंदणीस सुरुवात

21/07/2021
11 वी प्रवेश CET परीक्षेसाठी online फॉर्म भरण्याची सुरवात  

11 वी प्रवेश CET परीक्षेसाठी online फॉर्म भरण्याची सुरवात  

20/07/2021
10th-12th board exam timetable announced

10th-12th board exam timetable announced

21/12/2021
MSCE ने स्कॉलरशिप परीक्षा २०२१ चा निकाल जाहीर

MSCE ने स्कॉलरशिप परीक्षा २०२१ चा निकाल जाहीर

3
Screenshot 20211221 151345 Office Thakare Blog

ऑनलाईन गुगल क्लासरूम प्रशिक्षण

2
Elementary and Intermediate Drawing Grade Exam 2021-22 Online Application Process

Elementary and Intermediate Drawing Grade Exam 2021-22 Online Application Process

2
राज्यस्तरीय पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा पर्व -३

राज्यस्तरीय पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा पर्व -३

1
“अविरत टप्पा ४ “प्रशिक्षणाकरीता तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे ऑनलाईन प्रशिक्षण

“अविरत टप्पा ४ “प्रशिक्षणाकरीता तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे ऑनलाईन प्रशिक्षण

18/01/2023
सावित्रीबाई फुले निबंध मराठी

सावित्रीबाई फुले निबंध मराठी

03/01/2023

Happy New Year 2023 Wishes in Marathi

26/12/2022
ख्रिसमस नाताळ माहिती मराठी

ख्रिसमस नाताळ माहिती मराठी

20/12/2022

Recent News

“अविरत टप्पा ४ “प्रशिक्षणाकरीता तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे ऑनलाईन प्रशिक्षण

“अविरत टप्पा ४ “प्रशिक्षणाकरीता तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे ऑनलाईन प्रशिक्षण

18/01/2023
595
सावित्रीबाई फुले निबंध मराठी

सावित्रीबाई फुले निबंध मराठी

03/01/2023
3.5k

Happy New Year 2023 Wishes in Marathi

26/12/2022
3.5k
ख्रिसमस नाताळ माहिती मराठी

ख्रिसमस नाताळ माहिती मराठी

20/12/2022
686
ADVERTISEMENT
  • About us
  • Privacy Policy
  • Contact us
  • Disclaimer
Call us: +919168667007

© 2022 Thakare Blog - कुणीही वेबसाईट माहिती आमच्या परवानगी कोणत्याही ठिकाणी वापरू नये. वापरल्या कॉपीराईट कायद्या अंतर्गत कार्यवाही करण्यात येईल.Thakareblog.

No Result
View All Result
  • Home
  • शिक्षक कट्टा
  • विद्यार्थी कट्टा
  • Online शाळा
    • Courses
    • New registration
    • Login & Logout
    • Your Profiles
    • Edit Profile

© 2022 Thakare Blog - कुणीही वेबसाईट माहिती आमच्या परवानगी कोणत्याही ठिकाणी वापरू नये. वापरल्या कॉपीराईट कायद्या अंतर्गत कार्यवाही करण्यात येईल.Thakareblog.

Welcome Back!

Sign In with Facebook
OR

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Sign Up with Facebook
OR

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Alert: तुम्ही हि माहिती कॉपी करू शकत नाही.केल्यास कॉपीराईट नोटीस देण्यात येईल.