• About
  • Privacy & Policy
  • Contact
  • Disclaimer
  • Login
  • Register
Thakare Blog
  • Home
  • शिक्षक
  • विद्यार्थी कट्टा
  • शालेय स्पर्धा परीक्षा
  • प्रश्नपत्रिका
  • Online शाळा
    • Courses
    • New registration
    • Login & Logout
    • Your Profiles
      • Edit Profile
      • Recover Password
No Result
View All Result

No products in the cart.

  • Home
  • शिक्षक
  • विद्यार्थी कट्टा
  • शालेय स्पर्धा परीक्षा
  • प्रश्नपत्रिका
  • Online शाळा
    • Courses
    • New registration
    • Login & Logout
    • Your Profiles
      • Edit Profile
      • Recover Password
No Result
View All Result
Thakare Blog
No Result
View All Result
Home All Update's

NMMS Exam 2021-22 Exam will be held on 19th June

NMMS परीक्षा २०२१-२२ परीक्षा १९ जूनला होणार

thakareblog by thakareblog
06/04/2022
in All Update's, NMMS परीक्षा, विद्यार्थी कट्टा, शाळा माहिती Update, शिक्षक कट्टा, शैक्षणिक सूचना
78 2
Donate
0
Maharashtra NMMS Exam Thakare Blog
64
SHARES
1.6k
VIEWS
Share on What's appShare on Facebook

Table of Contents

  • 1. NMMS परीक्षा अर्ज करण्याची पध्दत | NMMS Exam Application Procedure
  • 2. NMMS परीक्षा पात्रता | NMMS Exam Eligibility
  • 3. NMMS परीक्षेचे वेळापत्रक | NMMS Exam Timetable
  • 4. NMMS परीक्षेसाठी विषय | Subject for NMMS exam
  • 5. NMMS शुल्क | NMMS Fee
  • 6. NMMS परीक्षेचा निकाल | NMMS Exam result
  • 7. NMMS शिष्यवृत्ती | NMMS Scholarship

NMMS परीक्षा २०२१-२२ परीक्षा १९ जूनला होणार | NMMS Exam 2021-22 Exam will be held on 19th June

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-१ यांचेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२१-२२ चे आयोजन इ. ८ वी मधील विद्यार्थ्यांसाठी रविवार दिनांक १९ जून २०२२ रोजी करण्यात येणार आहे.

  • अर्ज सुरु होण्याची दिनांक – ६ एप्रिल २०२२
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख –
  • NMMS परीक्षा दिनांक – १९ जून २०२२

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा

सन २००७- ०८ पासून इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुध्दिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे, त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी. आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

इ. ८ वी तील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उत्पन्न रु.१,५०,०००/- पेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप होईल.

01
of 07
NMMS परीक्षा अर्ज करण्याची पध्दत | NMMS Exam Application Procedure

दिनांक ०६/०४/२०२२ पासून ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या https://www.mscepune.in/व https://nmmsmsce.in या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध होतील.

02
of 07
NMMS परीक्षा पात्रता | NMMS Exam Eligibility

  1. महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय, शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी/ विद्यार्थीनीस या परीक्षेस बसता येते.
  2. पालकांचे (आई व वडील दोघांचे मिळून) वार्षिक उत्पन्न १,५०,०००/- पेक्षा कमी असावे. नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा / तलाठयांचा सन २०२०-२१ च्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा. सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करुन ठेवावा.
  3. विद्यार्थी विद्यार्थ्यांनी इ.७ वी मध्ये किमान ५५% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. (SC / ST चा विद्यार्थी किमान ५०% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा.)
  4. खालील विद्यार्थी NMMS परीक्षेसाठी अपात्र आहेत.
  • विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी.
  • केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
  • जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी,
  • शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजनव्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी.
  • सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी
हे वाचले का ? -  Relaxing after work

03
of 07
NMMS परीक्षेचे वेळापत्रक | NMMS Exam Timetable

महाराष्ट्रातील विविध केंद्रावर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) किंवा शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई यांचे मार्फत दिनांक १९ जून २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही परीक्षा घेणार आहे. सदर परीक्षेचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.

NMMS time Thakare Blog

सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ४०% मिळणे आवश्यक आहेत. (SC, ST, व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ३२% मिळणे आवश्यक आहेत.)

04
of 07
NMMS परीक्षेसाठी विषय | Subject for NMMS exam

सदर परीक्षेसाठी २ विषय असतील.

  1. बौध्दिक क्षमता चाचणी (MAT) :- ही मानशास्त्रीय चाचणी असून, त्यामध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित ९० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात.
  2. शालेय क्षमता चाचणी (SAT) :- ही सामान्यत: इयत्ता ७ वी व इयत्ता ८ वीच्या अभ्यासक्रमांवर

आधारित असेल. त्यामध्ये १. सामान्य विज्ञान एकूण (गुण-३५) २. समाजशास्त्र (एकूण गुण -३५) ३. गणित (एकूण गुण – २०) असे तीन विषय असतील.या तीन विषयांचे एकूण ९० प्रश्न सोडवायचे असतात.

उपविषयावर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल.

  • सामान्य विज्ञान ३५ गुण:- भौतिकशास्त्र ११ गुण, रसानशास्त्र ११ गुण, जीवशास्त्र १३ गुण.
  • समाजशास्त्र ३५ गुण :- इतिहास १५ गुण, नागरिकशास्त्र ०५ गुण, भूगोल १५ गुण
  • गणित २० गुण.

 

माध्यम :- प्रश्नपत्रिका मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराथी, उर्दू, सिंधी, कन्नड व तेलुगू या आठ माध्यमातून उपलब्ध असतील.(सर्व विद्यार्थ्यांना मूळमाध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येणार आहे.) यापैकी कोणतेही एकच माध्यम घेता येईल.

दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जातील.

प्रत्येक प्रश्नक्रमांकापुढे पर्यायांसाठी ४ वर्तुळे असतील. योग्य पर्यायाचे वर्तुळ निळे/काळे बॉलपेनने पूर्णत: रंगवून उत्तर नोंदवायचे आहे.

पेन्सिलचा वापर केलेली/अपुरी/अशंत: रंगवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत.

एकापेक्षा अधिक वर्तुळात नोंदविलेली/उत्तरे/चुकीच्या पध्दतीने नोंदवलेली उत्तरे/व्हाईटनर/खाडाखोड करुन नोंदविलेली किंवा गिरवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत.

हे वाचले का ? -  सीबीएसई बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द

05
of 07
NMMS शुल्क | NMMS Fee

परीक्षेसाठी खालीलप्रमाणे शुल्क अकारण्यात येते.

NMMS FEE Thakare Blog

06
of 07
NMMS परीक्षेचा निकाल | NMMS Exam result

सदर परीक्षेचा निकाल साधारण ऑगस्ट २०२२ च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडयात जाहीर करण्यात येईल. सदर परीक्षेचा निकाल व निवडयादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध केली जाईल. जिल्हयांनी, शाळांनी व विद्यार्थ्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरुनच काढावयाचा आहे.

07
of 07
NMMS शिष्यवृत्ती | NMMS Scholarship

  • शिष्यवत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास इ.९ वी ते १२ वी पर्यंत दरमहा रु. १,०००/(वार्षिक रु. १२,०००/-) शिष्यवृत्ती दिली जाते.
  • शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी इ.९ वी व इ. ११ वी मध्ये किमान ५५% गुण मिळणे आवश्यक आहे (SC/ST विद्यार्थ्यांना किमान ५०% गुणांची आवश्यकता आहे.)
  • इ. १० वी मध्ये किमान ६०% गुण मिळणे आवश्यक आहेत. (SC/ST विद्यार्थ्यांना किमान ५५% गुणांची आवश्यकता आहे.)

 

TAG- nmms exam 2021-22,nmms exam 2021-22 date,nmms exam 2021-22 apply online last date,nmms scholarship 2021-22,nmms exam date 2021-22 maharashtra,nmms exam date 2021-22 class 8, nmms scholarship 2021-22 exam date,nmms exam date 2021-22 maharashtra,nmms exam 2021-22 apply online last date, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना,राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती अभ्यासक्रम

Tags: nmms exam 2021-22nmms exam 2021-22 apply online last datenmms exam 2021-22 datenmms exam date 2021-22 class 8nmms exam date 2021-22 maharashtranmms scholarship 2021-22nmms scholarship 2021-22 exam date
SendShare26ShareScan

Get real time update about this post categories directly on your device, subscribe now.

Unsubscribe
Previous Post

FIT इंडिया मूव्हमेंट (मार्च 2022 – फेब्रुवारी 2023) अंतर्गत उपक्रम दिनदर्शिका

Next Post

Navodaya Entrance Exam 2022 Admit Card

Related Posts

परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीबाबत आवाहन
विद्यार्थी कट्टा

परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीबाबत आवाहन

by thakareblog
18/05/2022
1.1k
Thakare Blog
भाषण

महाराष्ट्र दिवस भाषण मराठी

by thakareblog
17/05/2022
522
शिष्यवृत्ती परीक्षा इ. ५ वी व इ. ८ वी-२०२२ साठी व्दितीय मुदतवाढ | शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक
विद्यार्थी कट्टा

शिष्यवृत्ती परीक्षा इ. ५ वी व इ. ८ वी-२०२२ साठी व्दितीय मुदतवाढ | शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक

by thakareblog
22/04/2022
4.9k
मुदतवाढ -राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTS) इ. १० वी साठी २०२१-२२
इतर परीक्षा

मुदतवाढ -राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTS) इ. १० वी साठी २०२१-२२

by thakareblog
19/04/2022
899
11th Online Admission 2022-23 process
विद्यार्थी कट्टा

11th Online Admission 2022-23 process

by thakareblog
18/04/2022
2.1k
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण मराठी
All Update's

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण मराठी

by thakareblog
12/04/2022
9k
Next Post
Navodaya Entrance Exam 2022 Admit Card

Navodaya Entrance Exam 2022 Admit Card

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व शाळांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व शाळांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण मराठी

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण मराठी

11th Online Admission 2022-23 process

11th Online Admission 2022-23 process

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

शासन निर्णय/ परिपत्रके

  • आयकर कपात नविन नियम परिपत्रक | दि 17 ऑगस्ट 2021
  • वरिष्ठ निवड श्रेणी 20/07/2021
  • पेन्शन मार्गदर्शिका फाईल
  • 2021 Calender by Income TAX

Live UpdateLive Update

Follow

Subscribe to notifications
Facebook Instagram Telegram Youtube

© 2021 Thakare Blog -ठाकरे ब्लॉगवरील माहिती हि संपूर्ण खात्रीदायकच असणार आहे, या ब्लॉगवरील माहिती इतर ठिकाणी विना परवानगीने प्रसिद्ध केल्यास @copywriter Act नुसार कारवाई करण्यात येईल. Next Update Groups.

No Result
View All Result
  • Home
  • शिक्षक
  • विद्यार्थी कट्टा
  • शालेय स्पर्धा परीक्षा
  • प्रश्नपत्रिका
  • Online शाळा
    • Courses
    • New registration
    • Login & Logout
    • Your Profiles
      • Edit Profile
      • Recover Password

© 2021 Thakare Blog -ठाकरे ब्लॉगवरील माहिती हि संपूर्ण खात्रीदायकच असणार आहे, या ब्लॉगवरील माहिती इतर ठिकाणी विना परवानगीने प्रसिद्ध केल्यास @copywriter Act नुसार कारवाई करण्यात येईल. Next Update Groups.

Welcome Back!

Sign In with Facebook
OR

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Sign Up with Facebook
OR

Fill the forms bellow to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
WordPress Ads

Add New Playlist

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Alert: तुम्ही हि माहिती कॉपी करू शकत नाही.केल्यास कॉपीराईट नोटीस देण्यात येईल.