दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी विलंब शुल्क आकारलं जाणार नाही.
No late fee will be charged for 10th and 12th exams.
कुठलेही विलंब शुल्क न भरता इ. १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या लेखी परीक्षा सुरु होण्याच्या अगोदरच्या दिवसापर्यंत परीक्षासाठीचे ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याची मुभा देण्यात आली आहे.
आतापर्यंत इ.१२ वीचे १४,३१,६६७ आणि इ.१० वीचे १५,५६,८६१ आवेदन पत्रं प्राप्त झाले आहेत.शाळेच्या संपर्कात नसलेल्या विद्यार्थ्यांना संपर्क करून परीक्षा फॉर्म भरून घेण्याबाबत (msbshe) Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education मार्फत सर्व शाळा,कॉलेजना कळवण्यात येईल व जाहीर प्रसिद्धी देण्यासाठी वर्तमान पत्रांद्वारे कळवण्यात येईल. तांत्रिक बाबींमुळे कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल.
परीक्षा आवेदनपत्र भरण्यासाठी इ.१०वी/ १२वीच्या विद्यार्थ्यांना मुदतीनंतर विलंब फी भरावी लागत होती. मात्र सध्याची आव्हानात्मक परिस्थिती पाहता यावर्षी मुदतीनंतर फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांना विलंब फी आकारण्यात येणार नसल्याची घोषणा मा.शिक्षणमंत्र्यांनी आज विधानपरिषद सभागृहात केली.