धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना सन २०२१-२२
Pre-Matric Scholarship Scheme for Religious Minority Students in the year 2021-22
Pre-Matric Scholarship Scheme ही योजना दि. २३ जुलै, २००८ च्या शासन निर्णयानुसार सन २००८-०९ पासून राज्यात राबविण्यात येते. ही शिष्यवृत्ती ( scholarship 2021) योजना मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, पारशी, बौध्द व जैन या धार्मिक अल्पसंख्याक इ. १ ली ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे.
केंद्रशासनाद्वारे प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्तीचे (Pre-Matric Scholarship Scheme) सन २०२१-२२ साठी नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरावयाची प्रक्रिया NSP 2.0 या पोर्टलवर दि. १८/०८/२०२१ पासून सुरू करण्यात आलेली आहे.
- नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि.
१५/११/२०२१३०/११/२०२११५ डिसेंबर २०२१ - शाळा स्तरावर पडताळणी करण्याची अंतिम मुदत दि.
१५/१२/२०२१३१ डिसेंबर २०२१ - जिल्हा स्तरावर पडताळणी करण्याची अंतिम मुदत दि.
३१/१२/२०२११५ जानेवारी २०२२
सन २०२१-२२ या वर्षासाठी सर्व इच्छूक तसेच मागील वर्षीच्या लाभार्थी विद्यार्थ्यांनी केंद्र शासनाच्या www.scholarships.gov.in (NSP 2.0 Portal) या संकेतस्थळावरून आपले अर्ज केवळ ऑनलाईन भरावयाचे आहे.
- सन २०२०-२१ या वर्षी ज्या विद्यार्थ्यांना (scholarships) शिष्यवृत्ती मिळालेली आहे अशाच विद्यार्थ्यांनी आपले अर्ज Renewal student म्हणून भरावयाचे आहेत. (नुतनीकरण विद्यार्थ्यांची यादी शाळेच्या लॉगिन मध्ये उपलब्ध आहे.)
- नवीन इच्छूक विद्यार्थ्यांनी आपले अर्ज Fresh student म्हणून भरावयाचे आहेत.
- प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्तीचे(Pre-Matric Scholarship Scheme) वाटप केंद्रशासनाकडून DBT (Direct Benefit Transfar) मोडद्वारे विद्यार्थ्यांच्या खात्यावर होत असल्याने विद्यार्थ्यांचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे आधार कार्ड नसेल तर आधार कार्डसाठी नोंदणी केलेली पावती (Enrollment ID) किंवा बँक पासबुक (छाया चित्रासह) किंवा रेशन कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा पास पोर्ट किंवा शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांक्षाकित केलेले फोटो सहीत असलेले विद्यार्थ्यांचे ओळख प्रमाणपत्रची सत्य प्रत शाळेत सादर करणे बंधनकारक आहे.
मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्तीसाठी पात्रतेचे निकष व आवश्यक कागदपत्रे | Eligibility Criteria and Prerequisites for Pre-Matric Scholarship पुढीलप्रमाणे-
-
पात्रतेचे निकष | Eligibility Criteria
१. शासन मान्यताप्राप्त सर्व व्यवस्थापनाच्या अनुदानित / विनाअनुदानित / स्वयंअर्थसहाय्यित शाळांतील इयत्ता १ ली ते १० वी मध्ये शिकणारे / शिकणाऱ्या अल्पसंख्याक समाजातील पात्र विद्यार्थी / विद्यार्थिनी.
२. मागील शैक्षणिक वर्षात ५० टक्के पेक्षा अधिक गुण असणे आवश्यक आहे. (ही अट इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना लागू नाही.)
३. पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. एक लाखापेक्षा कमी असावे.(सक्षम अधिकाऱ्याच्या सहीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.)
४. एका कुटुंबातील २ पेक्षा अधिक पाल्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही.
५. एकूण पात्र विद्यार्थ्यांपैकी ३० टक्के शिष्यवृत्ती विद्यार्थिनींसाठी राखीव आहे.
६. आधारकार्ड नंबर असणे आवश्यक आहे.
७. आधारकार्ड बँक खात्याशी जोडणे आवश्यक
आवश्यक कागदपत्रे / प्रमाणपत्रे | Required documents / certificates
१. विद्यार्थी शाळेत शिकत असल्याबाबतचे मुख्याध्यापकांचे बोनाफाईड प्रमाणपत्र.
२. मागील वर्षातील इयत्तेचे गुणपत्रक.
३. धर्माबाबत पालकांचे स्वयंघोषित प्रमाणपत्र.
४. पालकांच्या उत्पन्नाबाबत सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र.
5. रहिवासाचा पुरावा.
६. बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत / चेकची प्रत.
७. विद्यार्थ्याचा स्वयंसाक्षांकित फोटोग्राफ.
८. आधारकार्ड.
K.Y.C. फॉर्मबाबतः
NSP 2.0 या पोर्टलवरती अद्याप ज्या शाळांनी K.Y.C. फॉर्म भरलेला नाही अशा सर्व शाळांनी K.Y.C. फॉर्म भरणे बंधनकारक आहे.
PRE-MATRIC SCHOLARSHIP SCHEME 2021-22 परिपत्रक
शाळेचे नोडल ऑफिसर व शाळेचे मुख्याध्यापक यांची आधार नुसार माहिती भरण्याची प्रक्रिया.
- सन २०२१-२२ साठी प्रत्येक शाळेने Login केल्यानंतर शाळेचे प्रोफाईल अद्यावत करणे बंधनकारक आहे. (शिष्यवृत्तीसाठी अर्ज नसले तरीही)
- शाळेचे Nodal Officer यांनी शाळेचा Login ID व Password वापरुन NSP पोर्टलवर शाळा Login करावी व शाळेच्या प्रोफाईल मध्ये शाळेची सर्व माहिती भरावी व शाळेच्या मुख्याध्यापक यांनी नेमलेल्या नोडल ऑफिसर यांची माहिती किंवा मुख्याध्यापक यांची माहिती आधार नुसार contact person details मध्ये भरावी. यामध्ये नोडल ऑफिसर यांचा आधार क्रमांक, आधार वरील नाव, जन्मतारीख, लिंग, आधारला लिंक असलेला मोबाईल क्रमांक, पद इ.. माहिती भरावी.
- नोडल ऑफिसर यांच्या मोबाईल क्रमांका वरती OTP येईल तो Verify झाल्यानंतर प्रोफाईल अद्यावत होईल.
- Head of Institution Details मधील माहिती यामध्ये बदल करावयचा असल्यास नोडल ऑफिसर लॉगिन मधून प्रोफाईल अपडेट करणे बंधनकारक आहे. प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर हेड लॉगिन मधून शाळेच्या कार्यरत असणाऱ्या मुख्याध्यापक यांची माहिती आधार वरील माहिती नूसार अद्यावत करावी.
- शाळेचे नोडल ऑफिसर व मुख्याध्यापक बदलले गेल्यास नविन कार्यरत असणारे नोडल ऑफिसर यांची माहिती आधार नुसार इनस्टिटयूट नोडल ऑफिसर लॉगिन मधून व मुख्याध्यापक यांची माहिती आधार नुसार इनस्टिटयूट हेड लॉगिन मधून अद्यावत करण्यात यावी.