आयुष्मान भारत योजनेंतर्गत School Health & Wellness Programme प्रशिक्षणासाठी नोंदणी
Registration for School Health & Wellness Program Training under Ayushman Bharat Yojana
School Health & Wellness Programe ;- भारत सरकारने आयुष्मान भारत योजनेंतर्गत संपूर्ण देशात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि केंद्रीय शालेय शिक्षण मंत्रालय यांचेमार्फत शालेय आरोग्य कार्यक्रम (School Health & Wellness Programme) सुरु केला आहे. तदनुषंगाने राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग आणि शालेय शिक्षण विभाग यांच्या समन्वयाने आपल्या राज्यातील ठाणे, जालना, पालघर, नाशिक, यवतमाळ, हिंगोली, अहमदनगर या सात जिल्ह्यातील इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व शासकीय अनुदानित शाळांमध्ये सदर कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
- या अंतर्गत उपरोक्त जिल्ह्यातील इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व शासकीय अनुदानित प्रकारच्या प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक, एक पुरुष शिक्षक व एक महिला शिक्षिका असे एकूण तीन व्यक्तींना आरोग्यवर्धिनी दूत (School Health and Wellness Ambassador) म्हणून online प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
- जिल्हातील प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षणाधिकारी माध्यमिक/प्राथमिक यांनी समन्वयाने आपल्या जिल्ह्यातील इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व शासकीय अनुदानित शाळांमधील मुख्याध्यापक, एक पुरुष शिक्षक व एक महिला शिक्षक (ज्या शाळेत महिला शिक्षक नाही त्या शाळेतील दोन पुरुष शिक्षक) यांची १००% नोंदणी दि. १८/०३/२०२२ ते २२/०३/२०२२ या कालावधीत करणे अनिवार्य आहे.
- नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थी यांचे प्रशिक्षण दि.२३/०३/२०२२ ते २६/०३/२०२२ या कालावधीत ऑनलाईन स्वरुपात आयोजित करण्यात येणार आहे. तसेच सदर प्रशिक्षणासाठी लागणारे प्रशिक्षण साहित्य/घटकसंच पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
- प्रशिक्षणाचे वेळापत्रक यथावकाश पोर्टलवर उपलब्ध करून दिले जाईल.
आयुष्मान भारत योजनेंतर्गत शालेय आरोग्य कार्यक्रम (School Health Programme) प्रशिक्षणासाठी शाळा व प्रशिक्षणार्थी मुख्याध्यापक व शिक्षक यांनी खालील लिंकवर नोंदणी करावी.
नोंदणीसाठी येथे क्लिक करा. : https://shp.scertmaha.ac.in