• About us
  • Privacy Policy
  • Contact us
  • Disclaimer
  • Login
  • Register
Thakare Blog
ADVERTISEMENT
  • Home
  • शिक्षक कट्टाT
  • विद्यार्थी कट्टा
  • Online शाळा
    • Courses
    • New registration
    • Login & Logout
    • Your Profiles
    • Edit Profile
No Result
View All Result
  • Home
  • शिक्षक कट्टाT
  • विद्यार्थी कट्टा
  • Online शाळा
    • Courses
    • New registration
    • Login & Logout
    • Your Profiles
    • Edit Profile
No Result
View All Result
Thakare Blog
No Result
View All Result
ADVERTISEMENT
Home शिक्षक कट्टा

संशोधन प्रकल्प आर्थिक साह्य योजना 2021-2022

Research Project Financial Assistance Scheme

thakareblog by thakareblog
01/11/2021
in शिक्षक कट्टा, शैक्षणिक सूचना
14 1
0
संशोधन प्रकल्प आर्थिक साह्य योजना 2021-2022
36
SHARES
727
VIEWS
ADVERTISEMENT

Table of Contents

  • 1. सर्वसामान्य नियम
  • 2. आवेदनपत्र पाठवण्यासंबंधीचे नियम
  • 3. प्रकल्प निवडीसंबंधीचे नियम
  • 4. प्रकल्पाच्या कार्यवाहीसंबंधीचे नियम
  • 5. मार्गदर्शकासंबंधीचे नियम
  • 6. आर्थिक साह्याचे नियम
  • 7. आर्थिक साह्य व अन्य खर्च परत घेण्याबाबतचे नियम
  • 8. प्रकल्पाच्या हिशोबासंबंधीचे नियम
  • 9. प्रकल्पाचा अहवाल व हिशोब यांच्या स्वीकृतीचे नियम
  • 10. मानधन अदा करण्यासंबंधीचे नियम

संशोधन प्रकल्प आर्थिक साह्य योजना | Research Project Financial Assistance Scheme

  • पाठ्यपुस्तक मंडळाच्या संशोधन प्रकल्प आर्थिक साह्य योजनेअंतर्गत सन २०२१-२२ या संशोधन कार्यक्रमाची निश्चिती करण्यात आलेली आहे. संशोधन प्रकल्प विषय प्रामुख्याने शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके यावर आधारित आहेत.
  • पाठ्यपुस्तक मंडळाच्या संशोधन प्रकल्प आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत 2021-22 चा संशोधन कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.
  • संशोधन प्रकल्पाचे विषय प्रामुख्याने शालेय अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांवर आधारित आहेत.
  • संशोधन प्रकल्प प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षक, तसेच शिक्षक प्रशिक्षक यांना घेता येतील.
  • वैयक्तिक स्तरावरील प्रकल्पाचा कालावधी एक वर्षाचा असेल.
  • वैयक्तिक स्तरावरील प्रकल्पासाठी किमान रू. ५,०००/- आर्थिक साह्य देण्यात येईल.
  • पाठ्यपुस्तक मंडळाने सन २०२१-२२ संशोधन कार्यक्रमाची निश्चिती केलेली आहे.
  • आवेदनपत्र भरून या कार्यालयास पाठवण्याचा अंतिम दिनांक ३०/११/२०२१

संशोधन प्रकल्प आर्थिक साह्य योजना परिपत्रक

संशोधन प्रकल्प आर्थिक साह्य योजना सुधारित नियमावली

1 सर्वसामान्य नियम

(१) पाठ्यपुस्तक मंडळाच्या संशोधन कार्यक्रमातील प्रकल्पांसाठी आर्थिक साह्य देण्यात येईल.

(२) पाठ्यपुस्तक मंडळाच्या संशोधन कार्यक्रमात समाविष्ट नसलेल्या परंतु मंडळाच्या ध्येय-धोरणांशी निगडित अशा अन्य प्रकल्पांनाही आर्थिक साह्य देण्यात येईल. मात्र हे प्रकल्प इयत्ता १ ते ८ चा अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके यासंबंधीचेच असावेत.

3) प्रकल्पासाठी मंजूर केलेले आर्थिक साह्य मंडळाच्या आर्थिक साह्य योजनेनुसार देण्यात येईल, ते संस्थाप्रमुखांमार्फतच देण्यात येईल.

(४) आर्थिक साह्य योजनेनुसार प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन संस्थातील शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्र कल्प घेता येतील.

2 आवेदनपत्र पाठवण्यासंबंधीचे नियम

(1) आवेदक ज्या संस्थेत सेवेत असेल त्या संस्थाप्रमुखांमार्फतच आवेदकांनी आवेदनपत्रे पाठवली पाहिजेत.

(2) पाठ्यपुस्तक मंडळाच्या संशोधन कार्यक्रमाचे प्रकटन प्रसृत करण्यात येईल. हे प्रकटन सर्वसाधारणपणे दरवर्षी जून-जुलैमध्ये प्रसृत करण्यात येईल. या प्रकटनास अनुसरून आवेदकांनी आपली आवेदनपत्रे शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत पाठवली पाहिजेत व नगरपालिका/महानगरपालिकेच्या शाळेतील शिक्षकांनी आवेदनपत्रे शिक्षणप्रमुख यांच्यामार्फत पाठवली पाहिजेत.

(3) या योजनेनुसार प्रकल्प घेऊ इच्छिणाऱ्यांनी आपली आवेदनपत्रे विहित नमुन्यातच पाठवली पाहिजेत.

(4) एकापेक्षा अधिक प्रकल्पांसाठी आवेदनपत्रे पाठवावयाची झाल्यास प्रत्येक प्रकल्पासाठी एक याप्रमाणे स्वतंत्र आवेदनपत्रे पाठवली पाहिजेत. आवेदकांनी अन्य संस्थेच्या संशोधन प्रकल्पासाठी आवेदनपत्र पाठवले असल्यास वा अशा प्रकल्पांची कार्यवाही चालू असल्यास तसा स्पष्ट उल्लेख करणे जरूरीचे आहे. तसेच आवेदकांनी पाठ्यपुस्तक मंडळाच्या गेल्या वर्षीच्या कार्यक्रमातील प्रकल्प घेतला असल्यास व त्या प्रकल्पाची कार्यवाही चालू असल्यास नवीन प्रकल्पासाठी आवेदनपत्रे पाठविता येणार नाही.

हे वाचले का ? -  Extension for filling up of Elementary and Intermediate Exam Applications

(5) अपूर्ण आवेदनपत्रे तसेच मुदतीनंतर आलेली आवेदनपत्रे विचारात घेतली जाणार नाहीत.

(6) आवेदनपत्रासोबत आवश्यक ती कागदपत्रे उदा. प्रकल्पाचा आराखडा, अंदाजपत्रक इत्यादी जोडणे आवश्यक आहे.

संशोधन प्रकल्प आर्थिक साह्य योजना अर्ज PDF

3 प्रकल्प निवडीसंबंधीचे नियम

(१) पाठ्यपुस्तक मंडळाकडे आलेल्या आवेदनपत्रांतून प्रकल्पांची निवड करण्यात येईल. ही निवड प्रकल्प समिती/ संशोधन सल्लागार परिषद करील. प्रकल्पाच्या निवडीसंबंधीचा अंतिम निर्णय मंडळाच राहील.

(२) ज्या व्यक्तीस प्रकल्प देण्यात आला आहे, त्या व्यक्तीसच प्रकल्पाची कार्यवाही करावी लागेल.

(३) प्रकल्प संयुक्तरीत्या घेतला असल्यास त्यातील फक्त एका व्यक्तीसच प्रकल्पाचा प्रमुख मानण्यात येईल. प्रकल्पासंबंधीची सर्व जबाबदारी त्या प्रमुखाची राहील.

4 प्रकल्पाच्या कार्यवाहीसंबंधीचे नियम

(१) प्रकल्पाचे कार्यक्षेत्र प्रकल्प समिती / संशोधन सल्लागार परिषद निश्चित करील. /

(2) प्रकल्पाची कार्यवाही ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीनुसार व मार्गदर्शनानुसार करावी लागेल.

(3) प्रकल्पाच्या कार्यवाहीसंबंधी त्रैमासिक अहवाल व हिशोब विहित नमुन्यात मार्गदर्शक व संस्थाप्रमुखांमार्फत पाठवले पाहिजेत.

(4) प्रकल्पाची कार्यवाही पूर्ण झाल्यावर प्रकल्प अहवालाच्या चार प्रती टंकलिखित करून घेऊन त्यातील तीन प्रती मंडळास पाठवाव्या लागतील. अहवालाची फक्त एक प्रत प्रकल्पकास स्वत: साठी ठेवून घेता येईल.

(5) प्रकल्पाच्या अहवालाबरोबरच प्रकल्पासाठी झालेल्या खर्चाचा हिशोब मंडळास पाठवावा लागेल.

(6) प्रकल्पासाठी गोळा केलेल्या माहितीची कागदपत्रे आणि इतर साहित्य उदा. संदर्भग्रंथ, शिल्लक राहिलेली लेखनसामग्री इ. अहवालाबरोबरच परत करावे लागेल.

5 मार्गदर्शकासंबंधीचे नियम

(1) ज्या आवेदकांनी एम.फिल./पीएच.डी.(शिक्षण) पदवी धारण केली नसेल व ज्या आवेदकांना प्रकल्पाच्या कार्यवाहीसाठी मार्गदर्शकाची आवश्यकता असेल अशा आवेदकांना स्थानिक मार्गदर्शकाची मागणी करता येईल.

(२) आवेदकांनी ज्या मार्गदर्शकाची मागणी केली आहे, त्या मार्गदर्शकांनी एम.फिल/ पीएच.डी. (शिक्षण) पदवी धारण केलेली असली पाहिजे. तसेच त्यांना शैक्षणिक संशोधनाचा पुरेसा अनुभवही पाहिजे.

(3) मार्गदर्शक शक्यतो पाठ्यपुस्तक मंडळाच्या कोणत्याही समितीचे सदस्य नसावेत. तसेच दुसऱ्या प्रकल्पकास मार्गदशर्क म्हणून घेता येणार नाही म्हणजे प्रकल्पक व मार्गदर्शक या दोन्ही भूमिका एका वेळी करता येणार नाहीत, तथापि याबाबतीत अंतिम निर्णय समिती घेईल.

6 आर्थिक साह्याचे नियम

(1) प्रकल्पाच्या कार्यवाहीसाठी आवश्यक असलेला प्रवासखर्च, छपाई, टंकलेखन , टपालखर्च, लेखन सामग्री इ.करता देण्यात येणारे आर्थिक साह्य मंडळातर्फे निर्धारित करण्यात येईल. हे साहय वैयक्तिक स्तरावर किमान रू.५,०००/- व संस्था स्तरावर किमान रू.१०,०००/- मंजूर करण्यात येते.

हे वाचले का ? -  कोविड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकास सानुग्रह सहाय्यला अर्ज संकेतस्थळ

(2) काही विशिष्ट प्रकल्पांसाठी निर्धारित मर्यादेपेक्षा जास्तही आर्थिक साह्य देण्याचा मंडळ विचार करील.

(3) आर्थिक साह्याची रक्कम संस्थाप्रमुखांच्या नावे क्रॉस्ड चेकनेच पाठवण्यात येईल. संस्थाप्रमुखांमार्फत ती प्रकल्पकांना मिळेल. त्या रकमेची पोचपावती प्रकल्पकाला संस्थाप्रमुखांच्या प्रतिस्वाक्षरीसह दयावी लागेल.

(4) आर्थिक साह्याची रक्कम एकूण तीन हप्त्यांत व प्रकल्पाच्या प्रगतीवर अदा करण्यात येईल पहिल्या हप्त्याचा हिशोब दिल्याशिवाय पुढील हप्ता अदा करण्यात येणार नाही.

(5) आर्थिक साह्याचा तिसरा हप्ता प्रकल्पकाने अहवाल व हिशोब सादर केल्यानंतर अदा करण्यात येईल.

(6) आर्थिक साह्याच्या विनियोगास संस्थाप्रमुख जबाबदार राहतील. प्रकल्पासाठी करावयाच्या खर्चाचे नियम

(7) प्रकल्पासाठी करावा लागणारा स्थानिक व परगावचा प्रवासखर्च प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या प्रकल्पकासच मिळेल. प्रवासखर्च मंडळाच्या नियमानुसार व दरानुसार मिळेल.

(8) प्रकल्पांसाठी निर्धारित केलेल्या कार्यक्षेत्रातच केलेला प्रवासखर्च ग्राह्य धरण्यात येईल.

(9) प्रकल्पासाठी देण्यात येणाऱ्या आर्थिक साह्याची विविध बाबींसाठी विभागणी मंडळातर्फे निश्चिती करून देण्यात येईल. या मर्यादेतच प्रकल्पकांनी खर्च केला पाहिजे. कोण्या एका बाबीसाठी निर्धारित केलेली रक्कम शिल्लक राहिल्यास मंडळाच्या पूर्व संमतीने ती दुसऱ्या बाबीवर खर्च करता येईल.

(10) प्रकल्पाच्या विविध बाबींवरील खर्च प्रचलित दरानुसारच केला पाहिजे. तसेच हा खर्च वाजवी, गरजेनुरूप व योग्य त्या पद्धतीने केला पाहिजे.

(11) प्रकल्पासाठी होणारा खर्च आर्थिक साह्याच्या निर्धारित मर्यादेतच बसवावा लागेल.

(12) पाठ्यपुस्तक मंडळातर्फे देण्यात आलेल्या आर्थिक साह्याच्या रकमेतून शिल्लक राहिलेले आर्थिक साह्य मंडळास परत करावे लागेल.

(13) प्रकल्पाची कार्यवाही पूर्ण झाल्यावर प्रकल्पकांना मंडळाकडून मिळालेल्या आर्थिक साह्याच्या विनियोगाचे प्रतिज्ञापत्र (Certificate of Utilization) संस्थाप्रमुखांमार्फत मंडळास दयावे लागेल.

(14) प्रकल्पासाठी गोळा केलेली माहिती अथवा कागदपत्रे इतर कोणत्याही प्रकल्पाकरता अथवा कारणांकरता मंडळाच्या पूर्व परवानगीशिवाय वापरता येणार नाहीत.

(15) प्रकल्प अथवा प्रकल्पाचा काही भाग विदयापीठाची पदवी मिळवण्यासाठी उपयोगात आणावयाचा झाल्यास त्यासाठी अगोदर मंडळाची परवानगी घ्यावी लागेल.

7 आर्थिक साह्य व अन्य खर्च परत घेण्याबाबतचे नियम

(1) प्रकल्पकाने प्रकल्पाची कार्यवाही मुदतीपूर्वी सोडून दिल्यास प्रकल्पासाठी देण्यात आलेले आर्थिक साह्य व मार्गदर्शन सत्रांस उपस्थित राहण्यासाठी देण्यात आलेला प्रवासखर्च तसेच त्यांच्या स्थानिक मार्गदर्शकाला सत्रास उपस्थित राहण्यासाठी दिलेला प्रवासखर्च एकरकमी मंडळास परत करावा लागेल.

(2) प्रकल्पाची कार्यवाही निर्धारित मुदतीत पूर्ण न झाल्यासही प्रकल्पकास देण्यात आलेले आर्थिक साह्य व मार्गदर्शन सत्रांस उपस्थित राहण्यासाठी देण्यात आलेला प्रवासखर्च एकरकमी परत करावा लागेल.

(3) एखादया प्रकल्पाची कार्यवाही असमाधानकारक असल्याचे आढळून आल्यास तो प्रकल्प रद्द करण्यात येईल. रद्द केलेल्या प्रकल्पासाठी दिलेले आर्थिक साह्य व मार्गदर्शन सत्रांस उपस्थित राहण्यासाठी देण्यात आलेला प्रवासखर्च एकरकमी परत करावा लागेल.

(४) प्रकल्पकाने संस्थेतील नोकरी सोडल्यास प्रकल्पकास देण्यात आलेला प्रकल्प रद्द समजण्यात येईल. तसेच प्रकल्पकास मंडळातर्फे मिळालेले आर्थिक साह्य व प्रवासखर्च परत करावा लागेल. याबाबतची अंतिम जबाबदारी संस्थाप्रमुखांची राहील.

हे वाचले का ? -  शिष्यवृत्ती परीक्षा इ. ५ वी व इ. ८ वी-२०२२ साठी व्दितीय मुदतवाढ | शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक

(5) प्रकल्पाची कार्यवाही चालू असताना प्रकल्पकाची बदली झाली वा नवीन संस्थेत नोकरी धरली तर नवीन संस्थाप्रमुखांची प्रकल्पाची कार्यवाही चालू ठेवण्याबाबतची व सर्व जबाबदारी स्वीकारीत असल्याची अनुमती पाठवावी लागेल. तसे न झाल्यास सदर प्रकल्प पुढे चालू ठेवण्याबाबत प्रकल्प समिती/संशोधन सल्लागार परिषद निर्णय घेईल व त्याप्रमाणे प्रकल्पकास पूर्तता करावी लागेल.

8 प्रकल्पाच्या हिशोबासंबंधीचे नियम

(1) आर्थिक साह्याच्या रक्कमेचा हिशोब पाठ्यपुस्तक मंडळ ठरवून देईल त्या पद्धतीने ठेवावा लागेल. (2) प्रकल्पाची कार्यवाही पूर्ण झाल्यावर खर्चाच्या पावत्यांसह संपूर्ण हिशोब संस्थाप्रमुखांमार्फत पाठवला पाहिजे अहवाल व हिशोब सादर करण्याची अंतिम जबाबदारी संस्थांप्रमुखांची राहील.

(3) हिशोब तपासणीनंतर त्यात त्रुटी आढळून आल्यास त्यांची पूर्तता प्रकल्पकास त्वरित करावी लागेल. ही पूर्तता करण्याची जबाबदारी संस्थाप्रमुखांची राहील.

9 प्रकल्पाचा अहवाल व हिशोब यांच्या स्वीकृतीचे नियम

(1) प्रकल्पकाने सादर केलेला अहवाल प्रकल्प समिती/संशोधन सल्लागार परिषदेपुढे स्वीकृतीसाठी ठेवण्यात येईल.

(2) प्रकल्पकाने सादर केलेला हिशोब प्रकल्प समिती/संशोधन सल्लागार परिषदेपुढे स्वीकृतीसाठी ठेवण्यात येईल.

(3) प्रकल्प समिती/संशोधन सल्लागार परिषद जेवढा खर्च मान्य करील तेवढा खर्च ग्राह्य मानला जाईल.

(4) संशोधन सल्लागार परिषदेने प्रकल्पाचा अहवाल स्वीकारला नाही, तर प्रकल्पासाठी झालेला खर्च प्रकल्प समितीने मान्य करावयाचा किंवा कसे याबाबत प्रकल्प समिती/संशोधन सल्लागार परिषद निर्णय घेईल त्याप्रमाणे प्रकल्पकास पूर्तता करावी लागेल.

10 मानधन अदा करण्यासंबंधीचे नियम

(1) प्रकल्पकाने अहवाल व हिशोब सादर केल्यानंतर प्रकल्पासाठी केलेले परिश्रम व संशोधन दर्जा विचारात घेऊ प्रकल्पकास योग्य ते मानधन देण्यात येईल. हे मानधन सर्वसाधारणपणे रू. ५००/- पर्यंत देण्यात येईल. प्रकल्पकास मानधन दयावयाचे की नाही तसेच ते किती दयावयाचे यासंबंधीचा निर्णय प्रकल्पाच्या अहवालाच्या गुणवत्तेवर घेतला जाईल. यासंबंधीची प्रकल्प समिती/संशोधन सल्लागार परिषदेची शिफारस अंतिम समजण्यात येईल.

(2) प्रकल्पकाच्या अधिकृत मार्गदर्शकासही योग्य ते मानधन देण्यात येईल. हे मानधन सर्वसाधारणपणे रू.५००/- पर्यंत असेल हे मानधन प्रकल्प समिती/संशोधन सल्लागार परिषदेच्या शिफारशीनुसार देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

  • What’s App- Next Update Group
  • Telegram – https://telegram.me/aapalathakare
  • Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
  • Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw

Get real time update about this post categories directly on your device, subscribe now.

Unsubscribe
ADVERTISEMENT
Previous Post

माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी कला- उत्सव 2021

Next Post

शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांची हजेरी MahaStudent ॲपद्वारे

thakareblog

thakareblog

Related Posts

12 वीचा निकाल जाहीर तुमचा निकाल बघा
विद्यार्थी कट्टा

12 वीचा निकाल जाहीर तुमचा निकाल बघा

27/05/2023
16.3k
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन अर्ज ३ मार्चपासून
All Update's

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन अर्ज ३ मार्चपासून

01/03/2023
4.6k
“अविरत टप्पा ४ “प्रशिक्षणाकरीता तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे ऑनलाईन प्रशिक्षण
प्रशिक्षण

“अविरत टप्पा ४ “प्रशिक्षणाकरीता तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे ऑनलाईन प्रशिक्षण

01/02/2023
826
NMMS Exam 2022-23 | National Scholarship Scheme for Economically Weaker Students
All Update's

NMMS Exam 2022-23 | National Scholarship Scheme for Economically Weaker Students

10/10/2022
1.7k
भविष्य निर्वाह निधी (पीएफ) म्हणजे काय?
All Update's

भविष्य निर्वाह निधी (पीएफ) म्हणजे काय?

25/08/2022
1.7k
cropped-logomsce.jpg
All Update's

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ मध्ये झालेल्या गैरमार्गाने उत्तीर्ण उमेदवारांचे कायमस्वरूपी प्रतिबंध

03/08/2022
3.6k
Next Post
शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांची हजेरी MahaStudent ॲपद्वारे

शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांची हजेरी MahaStudent ॲपद्वारे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87k Followers
  • 23.8k Followers
  • 99 Subscribers
ADVERTISEMENT
  • Trending
  • Comments
  • Latest
दहावीचा निकाल 16 जुलैला होणार जाहीर

दहावीचा निकाल 16 जुलैला होणार जाहीर

17/07/2021
11 वी प्रवेश CET परीक्षेसाठी online फॉर्म भरण्याची सुरवात  

११ वी सामाईक प्रवेश परीक्षा परीक्षा नोंदणीस सुरुवात

21/07/2021
11 वी प्रवेश CET परीक्षेसाठी online फॉर्म भरण्याची सुरवात  

11 वी प्रवेश CET परीक्षेसाठी online फॉर्म भरण्याची सुरवात  

20/07/2021
10th-12th board exam timetable announced

10th-12th board exam timetable announced

21/12/2021
MSCE ने स्कॉलरशिप परीक्षा २०२१ चा निकाल जाहीर

MSCE ने स्कॉलरशिप परीक्षा २०२१ चा निकाल जाहीर

3
Screenshot 20211221 151345 Office Thakare Blog

ऑनलाईन गुगल क्लासरूम प्रशिक्षण

2
Elementary and Intermediate Drawing Grade Exam 2021-22 Online Application Process

Elementary and Intermediate Drawing Grade Exam 2021-22 Online Application Process

2
राज्यस्तरीय पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा पर्व -३

राज्यस्तरीय पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा पर्व -३

1
12 वीचा निकाल जाहीर तुमचा निकाल बघा

12 वीचा निकाल जाहीर तुमचा निकाल बघा

27/05/2023
“लेटस चेंज” हा चित्रपट येथे बघा.

“लेटस चेंज” हा चित्रपट येथे बघा.

11/04/2023
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन अर्ज ३ मार्चपासून

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन अर्ज ३ मार्चपासून

01/03/2023
मराठी राजभाषा दिन निबंध भाषण मराठी

मराठी राजभाषा दिन निबंध भाषण मराठी

22/02/2023

Recent News

12 वीचा निकाल जाहीर तुमचा निकाल बघा

12 वीचा निकाल जाहीर तुमचा निकाल बघा

27/05/2023
16.3k
“लेटस चेंज” हा चित्रपट येथे बघा.

“लेटस चेंज” हा चित्रपट येथे बघा.

11/04/2023
2.1k
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन अर्ज ३ मार्चपासून

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन अर्ज ३ मार्चपासून

01/03/2023
4.6k
मराठी राजभाषा दिन निबंध भाषण मराठी

मराठी राजभाषा दिन निबंध भाषण मराठी

22/02/2023
564
ADVERTISEMENT
  • About us
  • Privacy Policy
  • Contact us
  • Disclaimer
Call us: +919168667007

© 2022 Thakare Blog - कुणीही वेबसाईट माहिती आमच्या परवानगी कोणत्याही ठिकाणी वापरू नये. वापरल्या कॉपीराईट कायद्या अंतर्गत कार्यवाही करण्यात येईल.Thakareblog.

No Result
View All Result
  • Home
  • शिक्षक कट्टा
  • विद्यार्थी कट्टा
  • Online शाळा
    • Courses
    • New registration
    • Login & Logout
    • Your Profiles
    • Edit Profile

© 2022 Thakare Blog - कुणीही वेबसाईट माहिती आमच्या परवानगी कोणत्याही ठिकाणी वापरू नये. वापरल्या कॉपीराईट कायद्या अंतर्गत कार्यवाही करण्यात येईल.Thakareblog.

Welcome Back!

Sign In with Facebook
OR

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Sign Up with Facebook
OR

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Refresh
Powered By
Best Wordpress Adblock Detecting Plugin | CHP Adblock
Skip Ad >

Add New Playlist

error: Alert: तुम्ही हि माहिती कॉपी करू शकत नाही.केल्यास कॉपीराईट नोटीस देण्यात येईल.