शैक्षणिक वर्ष २०२३-२४ आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन अर्ज ३ मार्चपासून
Academic Year 2022-23 RTE 25% Admission Process Online Application from 3rd March
RTE 25% Online Admission;- सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत प्रवेश अर्ज भरणे आणि सादर करावयाच्या कागदपत्रांबाबत सर्व समावेशक सुधारित मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे.
दरवर्षी प्रमाणे सन २०२३-२४ या वर्षाची बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयंअर्थसाहीत शाळा, खाजगी विनाअनुदानित व खाजगी कायम विनाअनुदानित शाळांमध्ये (RTE 25% Online Admission) २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येत आहे. शासनाने दिलेल्या सुचना विचारात घेऊन सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरिता (RTE 25% Online Admission) आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेबाबत संचालनालयाचे पत्रान्वये सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. प्रवेश प्रक्रियेंतर्गत पात्र शाळांची नोंदणी पुर्ण झालेली आहे. सबब, बालकाच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविणेची प्रक्रिया दि.०१/०३/२०२३ दुपारी ०३:०० ते दि. १७/०३/२०२३ रात्री १२:०० वाजेपर्यंत सादर करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. आपण आरटीई २५ टक्के प्रक्रियेंतर्गत पालकांना अर्ज भरण्याबाबतच्या सुचना व्यापक स्वरुपात प्रसिद्धीस देण्यात यावी.
RTE 25% Online Admission Schedule
- अर्ज करण्यास सुरुवात – १ मार्च २०२३ [३ वाजेपासून]
- शेवटची तारीख – १७ मार्च २०२३ [रात्री १२ वाजेपारांत]
(RTE 25% Online Admission) ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सुचना:
- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयंअर्थसाहीत शाळा, खाजगी विनाअनुदानीत व खाजगी कायम विनाअनुदानित शाळांमध्ये इ. १ ली किंवा पुर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरीता पालकांनी https://student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया विहित मुदतीमध्ये पुर्ण करावी.
- वंचित गटातील बालकांमध्ये खालील प्रवर्गाचा समावेश होतो.
- वंचित गटातील बालकांच्या प्रवेशाकरीता वार्षिक कमाल उत्पन्नाची मर्यादा लागू नाही.
- आर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे अशा पालकांच्या बालकांचा आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो.
- २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरीता विचारपूर्वक १० शाळांची निवड करण्यात यावी.
- पालकांनी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंतचे हवाई अंतर हे गुगल मॅपने निश्चित करावयाचे असल्याने शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेवून पालकांनी बलूनद्वारे निवास स्थानाचे ठिकाण निश्चित करण्याकरीता तो बलून जास्तीत-जास्त ५ वेळाच निश्चित करता येईल यांची नोंद घ्यावी. त्यामुळे पालकांनी निवास स्थानाचे लोकेशन अचूक नमूद करावे.
- प्रवेश प्रक्रियेबाबत विहित मुदतीमध्ये परिपुर्ण अर्ज भरला जाईल याची दक्षता घ्यावी. अर्ज सादर करण्याच्या अंतिम कालावधीमध्ये इंटरनेट अथवा इतर तांत्रिक अडचणींमुळे परिपुर्ण अर्ज सादर करण्यामध्ये व्यत्यय येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सबब, शक्य तितक्या लवकर परिपुर्ण अर्ज सादर केला जाईल याची दक्षता घेण्यात यावी.
- प्रवेश प्रक्रियेबाबत आपणास काही समस्या असल्यास आरटीई पोर्टल वरती मदत केंद्राची माहिती देण्यात आलेली आहे. त्यांच्याशी संपर्क करुन समस्याचे निराकरण करण्यात यावे. पालकांनी ऑनलाईनन अर्ज करतांना अचुक व खरी माहिती भरावी. (उदा. घरचा पत्ता, जन्म दिनांक, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, इतर).
- ज्या बालकांनी यापूर्वी (RTE 25% Online Admission) आरटीई २५ टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकांला पुन्हा अर्ज करता येणार नाही.
- यापुर्वी २५ टक्के प्रवेश प्रक्रियेंतर्गत प्रवेश मिळालेल्या बालकाचा चुकीची माहिती भरुन पुन्हा प्रवेश घेतल्याचे निदर्शनास आल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल. तसेच पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज सादर करावा, एका पेक्षा अधीकचे अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास एकही अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही.
- पालकांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करण्यात येऊ नयेत.
Yes you like it was the only one thakare blog