२० फेब्रुवारी रोजी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली
Scholarship exam to be held on 20th February postponed
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) २०२२ च्या परीक्षेची अधिसूचना परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर परीक्षेचे नियमित शुल्कासह ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दिनांक ०१ डिसेंबर ते ३१ डिसेंबर, २०२१ या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती.परंतु शाळांना शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दिनांक १५ जानेवारी, २०२२ ते ३१ जानेवारी, २०२२ या कालावधीत मुदतवाढ देण्यात आली होती.
अर्ज भरणेसाठी मुदतवाढ दिल्याने दि. २०/०२/२०२२ रोजी होणाऱ्या परीक्षेच्या नियोजनासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध होत नसल्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली आहे. त्यामुळे परीक्षेची सुधारित तारीख यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल याची सर्व विद्यार्थी, शिक्षक,पालक नोंद घ्यावी.