मराठी भाषा विभागाची विशेष मोहीम | Special campaign of Marathi language department
“अभिमान मराठी, जन अभियान!”
“अभिमान मराठी अभिजात मराठी”
मराठी भाषा गौरव दिन-२०२२
अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे.केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष खालिलप्रमाणे ठरवलेले आहेत.
- भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावे
- भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे
- भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावेत
- प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रुप यांचा गाभा कायम असावा
हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून त्या-त्या राज्याला भरीव अनुदान मिळते.
भारत सरकारने आतापर्यंत तमिळ, संस्कृत, तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि ओडिआ या सहा भाषांना हा अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी महाराष्ट्र सरकारने रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमून ५०० पानांचा अहवाल भारतीय केंद्र सरकारकडे सादर केला होता.
परंतु आज पुन्हा आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केलेले आहे.तरी सर्व महाराष्ट्रातील मराठी बांधवांनी खालील Video बघावा आणि त्याप्रमाणे आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवा या साठी एक प्रयत्न करावा.
धन्यवाद …….
टीम – ठाकरे ब्लॉग
मराठी राजभाषा दिन निबंध भाषण मराठी