Table of Contents
स्वच्छ विद्यालय पुरस्कार सन २०२१-२२ सहभाग
Participated in Swachh Vidyalaya Puraskar 2021-22
स्वच्छ विद्यालय पुरस्कार स्पर्धेचे निकष व संपूर्ण प्रक्रिया
भारत सरकारने दि. २ ऑक्टोबर, २०१४ पासून संपूर्ण देशात स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केलेली आहे. देशातील सर्व शाळांसाठी सन २०१५-१६ पासून स्वच्छ विद्यालय पुरस्कार सुरू केलेला आहे. स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०२१-२२ साठी मार्गदर्शक सूचना तसेच शाळांसाठी नामनिर्देशन (Self Nomination) करताना आवश्यक असलेली प्रश्नावली केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवर स्वच्छ विद्यालय पुरस्कार मोबाईल अॅपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर पुरस्काराकरिता नामांकन करणाऱ्या शाळांनी सादर केलेल्या माहितीची पडताळणी जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर करण्यात येणार आहे.
स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील शासकीय, अनुदानित व खाजगी शाळा पात्र असून त्यांना या पुरस्कारासाठी नामांकन सादर करता येईल. पुरस्कारासाठी राष्ट्रीय पातळीवर ४६, राज्य पातळीवर २६ व जिल्हा पातळीवर ३८ शाळांची निवड करण्यात येणार आहे. स्पर्धेकरिता निश्चित करण्यात आलेल्या सहा उपघटकांसाठी ५९ निर्देशांक निश्चित करण्यात आले आहेत व त्यानुसार शाळांना प्राप्त होणारे गुण विचारात घेवून श्रेणी देण्यात येणार आहे.
पुरस्कारासाठी शाळांनी नामांकन सादर करण्याची अंतिम मुदत दि. ३१ मार्च, २०२२ आहे.
1 शाळांना सहभाग कसा घ्यावा.
http://education.gov.in → Swacch vidyalay → Swacch vidyalay puraskar 2021-22 या संकेतस्थळावर किंवा गुगल प्ले स्टोअर’ किंवा ‘Apple app स्टोअर’ वर उपलब्ध असलेल्या ‘Swachh Vidyalay Puraskar 2021-22’ या app वर शाळेचा UDISE कोड वापरुन नोंदणी करावी.