शिक्षक दिनानिमित्त Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह
Thank a Teacher Campaign on the occasion of Teacher’s Day
शिक्षण क्षेत्रांमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी संपूर्ण देशामध्ये दरवर्षी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त सन २०२०-२१ मध्ये Thank A Teacher अभियान राबविले होते, २०२१-२२ यावर्षी देखील शिक्षकांचा गौरव करण्यासाठी Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.
सद्यस्थितीत कोविड-१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व ठिकाणी शाळा नियमितपणे सुरु करता आलेल्या नाहीत. तरी देखील अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु रहावे यासाठी दुर्गम भागातील अनेक शिक्षकांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना घरी जाऊन, समुह मार्गदर्शन वर्ग आयोजित करून विविध प्रकारे मार्गदर्शन करून शेवटचा विद्यार्थी शिक्षण प्रवाहात राहण्यासाठी प्रयत्न केले आहे. विविध मार्गाने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु ठेवण्यासाठी आणि विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी शिक्षक सातत्याने प्रयत्न करत आहेत.
- अशा सर्व शिक्षकांविषयी आदर व आभार व्यक्त करण्यासाठी शासनाने दि.०२ सप्टेंबर २०२१ ते ०७ सप्टेंबर २०२१ या कालावधीत ThankA Teacher अभियानांतर्गत शिक्षक गौरव सप्ताह साजरा करण्याचे ठरविले आहे.
- राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी मधील विद्यार्थ्यासाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत.
- या कालावधीमध्ये शालेय स्तरावर निबंध लेखन, काव्य वाचन, काव्य लेखन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे ऑनलाईन/ऑफलाईन स्वरुपात आयोजन करावे.
- तसेच शिक्षकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांच्या र्याचा गौरव करण्यात यावा.
शिक्षक दिनानिमित्त Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षकांच्या कार्य गौरव प्रित्यर्थ खालील कार्यक्रमांचे

कार्यक्रमांचे आयोजन करून त्याचे व्हिडीओ, फोटो व इतर साहित्य समाजमाध्यामांवर Facebook- @thxteacher , Twitter-@thxteacher, Instagram-@thankuteacher अशा प्रकारे टॅग करुन अपलोड करावेत. यावेळी #ThankATeacher #ThankYouTeacher #MyFavouriteTeacher #MyTeacher MyHero #ThankATeacher2021 या हॅशटॅग (#) चा वापर करावा.
यामधील सर्वोत्तम असलेल्या कार्यक्रमापैकी “राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद” महाराष्ट्र (SCERT) ने जिल्हानिहाय व गटनिहाय तीन सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.
कोरोनाची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर सदर विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन यथोचित गौरव करण्यात येणार.