• About us
  • Privacy Policy
  • Contact us
  • Disclaimer
  • Login
  • Register
Thakare Blog
  • Home
  • शिक्षक कट्टाT
  • विद्यार्थी कट्टा
  • Online शाळा
    • Courses
    • New registration
    • Login & Logout
    • Your Profiles
    • Edit Profile
No Result
View All Result
  • Home
  • शिक्षक कट्टाT
  • विद्यार्थी कट्टा
  • Online शाळा
    • Courses
    • New registration
    • Login & Logout
    • Your Profiles
    • Edit Profile
No Result
View All Result
Thakare Blog
No Result
View All Result
ADVERTISEMENT
Home All Update's

जलप्रदूषणाच्या समस्येचे गांभीर्य आणि पाण्याच्या सुरक्षिततेचा अभ्यास(जलसुरक्षा)

Study the seriousness of water pollution problem and water security

thakareblog by thakareblog
18/02/2022
in All Update's, प्रकल्प, विद्यार्थी कट्टा
11 0
0
जलप्रदूषणाच्या समस्येचे गांभीर्य आणि पाण्याच्या सुरक्षिततेचा अभ्यास(जलसुरक्षा)
27
SHARES
544
VIEWS
ADVERTISEMENT

Table of Contents

  • 1. विषयाचे महत्व
  • 2. प्रकल्पाची उद्दिष्टे
  • 3. पाण्याचे प्रदूषण
  • 4. पाण्याच्या प्रदूषणास कारणीभूत ठरणारे घटक
  • 5. जलप्रदूषणामुळे होणारे परिणाम
  • 6. जलप्रदूष थांबवण्यासाठी उपाय-योजना
  • 7. निरीक्षणे
  • 8. विश्लेषण
  • 9. निष्कर्ष
  • 10. संदर्भ

विषय -जलप्रदूषणाच्या समस्येचे गांभीर्य आणि पाण्याच्या सुरक्षिततेचा अभ्यास(जलसुरक्षा)

प्रस्तावना

आज आपण २१ व्या शतकात जगत आहोत.आज आपल्यासमोर अनेक मोठ मोठ्या समस्या आहेत, त्यापैकी एक समस्या म्हणजे दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत जाणाऱ्या लोकसंख्येला पिण्यासाठी स्वच्छ आणि सुरक्षित पाणी उपलब्ध करून देणे. आज विकसनशील देशातील देशांतील लोकांना पाण्याच्या समस्येला मोठ्या प्राणावर सामोरे जावे लगत आहे. हवामानात झालेले बदल आणि लोकसंख्या वाढीपासून ते अगदी शहरांतील बिघडलेल्या अत्यावश्यक सुविधांपर्यंत अशा अनेक समस्यांचा जगातील अनेक शहरांना सामना करावा लागत आहे.

भविष्यात सर्वांना त्यांच्या गरजांनुसार पायाभूत सुविधा पुरविणे तसेच पाण्याचे योग ते व्यवस्थापन करणे हे कठीण होत जाणार आहे. आज पाण्याच्या व्यवस्थापनाच्या नवनवीन पद्धतींचा अवलंब करणे गरजेचे आहे. विकसनशील देशांमधील वाढत जाणारी शहरे तसेच खेडेगावातील वस्त्या यांकडे पाण्याच्या व्यवस्थापनावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

दिवसेंदिवस वाढत जाणारे औद्योगिकीकरण , शहरीकरण तसेच अनेक शेतीची कामे या सर्व प्रक्रियांमुळे आज मोठ्या प्रमाणवर कळत नकळत आपल्याकडून नद्या , तळी तसेच समुद्र मोठ्या प्रदूषित होताना आपल्याला दिसत आहेत. जर हे असेच सुरु राहिले तर या सृष्टीचा अंत होण्यास जास्त काळ लागणार नाही. याचाच एक परिणाम आपल्याला दिसू लागला आहे. पृथ्वी वरील अनेक प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या जाती वेगाने लुप्त होत चालल्या आहेत.

आज आपण या प्रकल्पाच्या माध्यमातून “जलप्रदूषणाच्या समस्येचे गांभीर्य आणि पाण्याच्या सुरक्षिततेचा अभ्यास” या विषयाबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत.

अनुक्रमणिका

अ.क्र. घटक पान नं.
१) विषयाचे महत्व
२) प्रकल्पाची उद्दिष्टे
३) पाणी टंचाई
४) पाण्याचे प्रदूषण
५) पाण्याच्या प्रदूषणास कारणीभूत ठरणारे घटक
६)  जलप्रदूषणामुळे होणारे परिणाम
७) जलप्रदूष थांबवण्यासाठी उपाय-योजना
८) जलसुरक्षा अभियान
९) निरीक्षण
१०) निष्कर्ष
११) संदर्भ

1 विषयाचे महत्व

पृथ्वीवरील सर्वात महत्वाचे आणि मौल्यवान संसाधन कोणते असेल तर ते पाणी आहे. आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्येक कामात पाण्याची गरज भासते . एवढेच नाही तर शेतीसाठी ,सिंचनासाठी, उत्पादन करणाऱ्या मोठ मोठ्या कारखान्यांमध्ये, वीजनिर्मिती केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते. ही गरज भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भूजलाचा उपसा केला जातो. त्यामुळे आज भूजलाची पातळी घटत चालली आहे. आज विविध प्रक्रिया केलेले दुषित पाणी आपण जसेच्या तसे चांगल्या जलस्त्रोतांमध्ये सोडत आहोत त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे प्रदूषण होत आहे. पाण्याच्या प्रदूषणाची ही समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत चालली आहे. जर हे असेच चालत राहिले तर येणाऱ्या भविष्यात मानवाला मोठ्या प्रमावर पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागणार आहे. जर हे सारे थांबवायचे असेल तर आत्ताच योग्य त्या उपाययोजना करून पाण्याचे प्रदूषण कमी करणे गरजेचे आहे. त्यासाठी जल प्रदूषण समस्येचे गांभीर्य अभ्यासणे गरजेचे आहे.

हे वाचले का ? -  जागतिक ओझोन दिन निबंध

2 प्रकल्पाची उद्दिष्टे

  1. पाण्याच्या प्रदूषिकारणाबाबत अधिक माहिती जाणून घेणे.
  2. पाण्याचे महत्व समजून घेणे.
  3. पाण्याचे प्रदूषणास कारणीभूत स्त्रोतांचा अभ्यास करणे.
  4. पाण्याच्या प्रदूषणाने होणाऱ्या घातक परिणामांचा अभ्यास करणे.
  5. जलसंवर्धन आणि जलव्यवस्थापन पद्धतींचा अभ्यास करणे.
  6. जलसुरक्षा अभियानाबाबत माहिती मिळविणे.
  7. जलस्त्रोतांच्या प्रदूषणाबाबत इतरांना अधिक माहिती मिळवून देणे आणि योग्य ती काळजी घेण्यास भाग पाडणे.

पाणी टंचाई

सर्व सजीवांना आपले जीवन जगण्यासाठी पाणी हे अतिशय महत्वाचे आहे. आजची परिस्थिती पहिली तर कित्येक राज्यांमध्ये जानेवारी महिना सुरु झाला न झाला तोच पाण्याच्या टंकर नी पाणी पुरवावे लागते. एका सर्वेक्षाणा नुसार असे लक्षात आले की २०२५ पर्यंत भारतासह जगातील ५० पेक्षा जास्त देशांना या पाणी टंचाई च्या संकटाला सामोरे जावे लागेल.

भारतामध्ये मान्सून च्या पावसाद्वारे पाणी उपलब्ध होत असते. भारतातील पावसाची सरासरी ही ११७ सेमी आहे तर महाराष्ट्रातील पावसाची सरासरी ही १०१ सेमी इतकी आहे. कोंकण भागात पाण्याची उपलब्धता हिये ३०० सेमी पेक्षाही जास्त आढळते, तर दुसरीकडे सांगली, सातारा, सोलापूर, मराठवाडा इ. पूर्वेला असणाऱ्या भागांत पावसाची सरासरी खूप कमी म्हणजे ५० सेमी इतकी आहे. अंबोली आणि गडचिरोली या भागांत पावसाच्या दिवसांत सर्वात जास्त प्रमाणात पाऊस पडत असला तरीही तेथे उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असते. पर्वतांच्या तीव्र उतारामुळे व पाणी साठवून ठेवण्यासाठी पुरेशा सोई- सुविधा नसल्या कारणाने भूपृष्ठावरून पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जाते. त्यामुळे या भागांत उन्हाळ्याच्या दिवसात  पण्याची मोठ्या प्रमाणवर टंचाई जाणवते.

3 पाण्याचे प्रदूषण

  • पाण्याची गुणवत्ता:

पाण्याची शुद्धता म्हणजेच पाण्याची गुणवत्ता किंवा अनावश्यक घटकांशिवाय असलेले पाणी. पाणी हे अनावश्यक घटत पाण्यात मिसळल्याने दुषित होते. जसे की सुक्षजीव, औद्योगिक कचरा, रसायने यांसारख्या घटकांमुळे पाण्याची गुणवत्ता खालावते आणि हे पाणी पिण्यासाठी अयोग्य बनते. ज्या वेळी कारखान्यातून बाहेर पडणारे दुषित पाणी, किंवा गटाराचे दुषित पाणी चांगल्या पाण्याच्या स्त्रोतामध्ये सोडले जाते तेव्हा अनावश्यक असणारे घटक पाण्यात विरघळतात, तर काही पदार्थ पाण्यावर तसेच तरंगत राहतात. तेव्हा पाण्याचे दुषीती करण होऊन त्याचा जलसंस्थेवर वाईट परिणाम होतो.

जलप्रदूषणाची व्याख्या खालील प्रमाणे केली जाऊ शकते

‘पाण्याचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म कोणत्याही प्रकारे बदलणे ज्यायोगे त्याच्या वापरास अडथळा निर्माण होईल’

सर्वसाधारणपणे पाण्यात वायू क्षार व इतर घटत हे आधीपासूनच काही प्रमाणात मिसळलेले असतात. परंतु ते अल्प प्रमाणत असल्याने पाणी पिण्यायोग्य असते. पण जेव्हा हे अनावश्यक असणारे घटकांचे प्रमाण अतिशय वाढते तेव्हा, पाण्याला दुर्गंधी येऊ लागते, पाणी गढूळ होऊ लागते, पाण्यात विविध प्रकारच्या जलचर वनस्पती वाढून पाण्याची गुणवत्ता खालावते. आणि त्या स्त्रोतातील ते पाणी मानवाच्या दैनंदिन उपयोगासाठी अयोग्य ठरते.

हे वाचले का ? -  हिंदी दिवस का जबरदस्त भाषण

4 पाण्याच्या प्रदूषणास कारणीभूत ठरणारे घटक

शेतीतून बाहेर पडणारा कचरा:

आज कमी जागेत मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेण्यासाठी शेतकरी सर्रास विविध प्रकारची रासायनिक खते वापरतात. या विषारी खतांचा आणि कीटकनाशकांचा मानव, प्राणी आणि त्याचबरोबर पर्यावरणावरदेखील मोठ्या प्रमाणवर हानिकारक परिणाम होतो. मोठ्या प्रमाणात वापरलेली खते ही पावसाच्या पाण्याद्वारे भूगर्भात झिरपतात आणि परिणामी भूजल स्त्रोत दुषित होतात. आजच्या आधुनिक शेतीमध्ये कीडनाशके, कीटक नाशके तसेच तण नाशके यांचा अतिवापर शेतीसाठी केला जातो, परंतु हे सर्व पाण्याबरोबर वाहत जाऊन आसपासच्या जाल्स्त्रोतांत मिसळले जातात. आणि ते पाण्याच्या स्त्रोताचे प्रदूषण करण्यास कारणीभूत ठरतात.

घरगुती कचरा ( सांडपाणी) :

घरगुती कचरा या प्रकारामध्ये मलमूत्र , अन्न कचरा, कागद, कपडे धुण्याच्या विविध पावडरी यांसारख्या घटकांचा समावेश होतो. टाकावू पदार्थांची योग्य ती विल्हेवाट न लावल्याने ती सामग्री शेवटी तलाव, ओढे, नद्या यांसारख्या जलस्त्रोतांमध्ये मिसळली जाते. आणि त्यामुळे जलप्रदूषण होते.

औष्णिक प्रदूषण:

अणुउर्जा प्रकल्प तसेच औष्णिक विद्युत केंद्रांमध्ये तापमान कमी करण्याच्या उद्देशाने थंड पाण्याचा वापर केला जातो. परतू हे थंड पाणी विविध प्रक्रियांतून जात असल्याने त्याचेही तापमान मोठ्या प्रमाणवर वाढते. असे हे उष्ण पाणी प्रकल्पाच्या जवळ असणाऱ्या तलावात किंवा इतर जल्स्त्रोतात सोडले जाते. तेव्हा औष्णिक प्रदूषण होते. अशा या औष्णिक प्रदूषणाचा जलचरांवर फार हानिकारक परिणाम होतो.

औद्योगिक कचरा:

कागद उद्योग, पोलाद उद्योग यांसारख्या उद्योगांमध्ये उत्पादन प्रक्रियांसाठी मोठ्या प्रमाणवर पाण्याची गरज भासते. म्हणूनच असे मोठ मोठे उद्योग हे नद्यांच्या काठावर असलेले आपल्याला पाहायला मिळतात.  वस्त्रोद्योग असो वा चामडे, औषधे निर्मा करणारा उद्योग असो असे अनेक विविध प्रकारचे उद्योग ज्यांमध्ये पाण्याची प्रचंड गरज भासते असे उद्योग नद्यांच्या काठावर वसवले जातात आणि या कारखान्यातून बाहेर पडणारे प्रक्रिया न केलेले प्रदूषित पाणी हे जवळच्या जलस्त्रोतात सोडले जाते आणि या प्रदूषित पाण्यात असणाऱ्या हानिकारक घटकांमुळे पाण्याचे प्रदूषण होते.

5 जलप्रदूषणामुळे होणारे परिणाम

1.घरगुती सांडपाण्यामुळे होणारे हानिकारक परिणाम:

घरातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यामध्ये अनेक प्रकारची पोषक द्रव्ये मिसळलेली असतात. त्यामुळे त्या पाण्यात ऑक्सिजन विरघळण्याचे प्रमाण वाढते परिणामी त्या पाण्याच्या रंग बदलतो आणि पाण्याला दुर्गंध यायला सुरुवात होते.घरातील सांडपाणी जलस्त्रोतांमध्ये मिसळल्याने तेथे विषाणूंची वाढ होऊन. विविध प्रकारच्या रोगाच्या साथी पसरतात.विषाणू, रोगास कारणीभूत असणारे जीवाणू यांची या पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढ होते परिणामी टायफॉईड, कॉलरा, हगवण, यांसारखे गंभीर आजार होतात.

  1. औद्योगिक कचऱ्यामुळे होणारे हानिकारक परिणाम:

जलसाठ्यांचा रंग, गंध आणि पाणी गढूळ होण्यास प्रक्रिया न केलेले औद्योगिक सांडपाणी स्त्रोतात सोडल्याने या समस्या उद्भवतात. अल्कलीयुक्त पदार्थ जसे की, साबण , कपडे धुण्याची पावडर यांमुळे जो फेस तयार होतो त्यामुळे पाण्याची गुणवत्ता खालावते.माग्नेशिअम सारख्या घटकांचे प्रमाण पाण्यात वाढल्याने पाण्याचा कठीणपणा वाढला जातो आणि त्या जलसाठ्यातील पाणी हे घरगुती वापरासाठी अयोग्य ठरते.

हे वाचले का ? -  राष्ट्रीय गणित दिवस 2021: श्रीनिवास रामानुजन बद्दल

3.शेतीतील कचऱ्यामुळे होणारे हानिकारक परिणाम :

आज मोठ्या प्रमाणावर रसायिक खते व कीटक नाशकांचा वापर वाढला आहे ही रासायनिक खते कीटकनाशके अतिवृष्टीमुळे तसेच सिंचनासाठी पाण्याच्या अतिवापर केल्याने ती पाण्यासोबत जमिनीत झिरपतात. ज्यामुळे भूजलस्त्रोत प्रदूषित होतात.

शेतीसाठी उपयुक्त असणाऱ्या सुक्ष्म वनस्पती, गांडुळे, यांसारख्या प्राण्यांवर रासायनिक खतांचा हानिकारक परिणाम होतो. परिणामी शेतीची जमीन ही नापीक बनते.

फवारणी साठी वापरले गेलेले डबे, तसेच इतर साहित्य पाण्याच्या स्त्रोतात धुतल्याने देखील जलप्रदूषण होते.

4.औष्णिक प्रदूषणाचे होणारे घातक परिणाम:

कारखान्यातून बाहेर पडणारे गरम पाणी जसेच्या तसे जलसाठ्यात सोडल्याने पाण्याचे रासायनिक व भौतिक गुणधर्मात बदलाव येतो.पाण्यामध्ये विरघळेला प्राणवायू कमी होतो परिणामी तेथील जलचरांवर हानिकारक परिणाम होतो.औष्णिक प्रदूषण हे जलचरांच्या स्थलांतरणास कारणीभूत ठरते.

6 जलप्रदूष थांबवण्यासाठी उपाय-योजना

जलप्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी जलप्रदूषण करण्याऱ्या स्त्रोतांवर कडक निर्बंध लागू करणे गरजेचे आहे.

औद्योगिक कारखान्यातून बाहेर पडणारे सांडपाणी जसेच च्या तसे जलस्त्रोतात न सोडता त्यावर आधी योग्य ती प्रक्रिया करणे आवश्यक आहे.महानगर पालिका तसेच नगरपालिका यांद्वारे गोळा केला जाणारा कचरा जलस्रोतात न टाकता त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी.जर कोणी जलप्रदूषणाच्या नियमाचे उल्लंघन करत असेल तर त्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.विविध कार्यक्रमांसाठी वापरलेली फुले, तसेच निर्माल्य जलस्त्त्रोतात टाकून दिले नाही तर जलप्रदूषण कमी होण्यास नक्कीच मदत होईल.लोकांमध्ये जलप्रदूषणा बाबत जागृती करून जलप्रदूषण कमी करण्याच्या प्रयत्न करावा.

जलसुरक्षा अभियान

(जलसुरक्षा अभियान ९ ऑगस्ट २०१९ )

समग्र शिक्षा- जलसुरक्षा अभियान हे देशातील विद्यार्थ्यांमध्ये पाणी संवर्धनाबाबत जागृती निर्माण होण्याच्या उदेशाने मानव व संसाधन विकास विभागाने आयोजित केले. या अभियाना अंतर्गत विद्यार्थ्यांना पाण्यासंदर्भात एक सक्षम नागरिक बनविण्याचा प्रयत्न करीत आहे. विद्यार्थ्यांना लहान वयातच पाण्याचे महत्व समजावे यासाठी हे अभियान कार्यरत आहे. आजच्या काळात विद्यार्थ्यांना जलसंधारण सारखे उपक्रम करण्यास सक्षम करीत आहे.

7 निरीक्षणे

जलस्त्रोतांचे प्रदूषण होण्यास कारणीभूत ठरणारे घटक

Untitled Thakare Blog

8 विश्लेषण

दैनंदिन वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यातील घटकांचे प्रमाण खालील प्रमाणे:

पिण्यायोग्य पाण्यातील घटकांचे प्रमाण

अ.क्र. घटक प्रमाण एकक
१ पीएच ७-८.५ मिलिग्रॅम/लि
२ कॅल्सीआम ३०-८० मिलिग्रॅम/लि
३ माग्नेशियम १०-५० मिलिग्रॅम/लि
४ बायकार्बोनेट १००-३०० मिलिग्रॅम/लि
५ सल्फेट २५-१०० मिलिग्रॅम/लि
६ फ्लोराइड ०.५-१.० मिलिग्रॅम/लि
७ क्लोराईड २०-५० मिलिग्रॅम/लि
८ टी.डी.एस. १००-५०० मिलिग्रॅम/लि

 

9 निष्कर्ष

  • पाण्याच्या प्रदूषिकारणाबाबत अधिक माहिती जाणून घेतली.
  • पाण्याचे महत्व समजावून घेण्यास मदत झाली.
  • पाण्याचे प्रदूषणास कारणीभूत स्त्रोतांचा अभ्यास केला.
  • पाण्याच्या प्रदूषणाने होणाऱ्या घातक परिणामांची सविस्तर माहिती घेतली.
  • जलसंवर्धन आणि जलव्यवस्थापन पद्धतींचा अभ्यास केला.
  • जलसुरक्षा अभियानाबाबत माहिती संग्रहित केली.

10 संदर्भ

-इंटरनेट

Get real time update about this post categories directly on your device, subscribe now.

Unsubscribe
ADVERTISEMENT
Previous Post

शासकीय इंटरमिजिएट परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाईनच होणार

Next Post

२० फेब्रुवारी रोजी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली

thakareblog

thakareblog

Related Posts

सावित्रीबाई फुले निबंध मराठी
All Update's

सावित्रीबाई फुले निबंध मराठी

03/01/2023
3.5k
All Update's

Happy New Year 2023 Wishes in Marathi

26/12/2022
3.5k
ख्रिसमस नाताळ माहिती मराठी
All Update's

ख्रिसमस नाताळ माहिती मराठी

20/12/2022
686
National Mathematics Day 2022
All Update's

National Mathematics Day 2022

20/12/2022
3.5k
NMMS Exam 2022-23 | National Scholarship Scheme for Economically Weaker Students
All Update's

NMMS Exam 2022-23 | National Scholarship Scheme for Economically Weaker Students

10/10/2022
1.7k
महात्मा गांधीचे सर्वात जुने फोटो, तुम्ही बघितले का?
All Update's

गांधी ई-बुक्स मोफत ई-बुक्स डाउनलोड करा.

30/09/2022
3.5k
Next Post
२० फेब्रुवारी रोजी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली

२० फेब्रुवारी रोजी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87k Followers
  • 23.7k Followers
  • 99 Subscribers
ADVERTISEMENT
  • Trending
  • Comments
  • Latest
दहावीचा निकाल 16 जुलैला होणार जाहीर

दहावीचा निकाल 16 जुलैला होणार जाहीर

17/07/2021
11 वी प्रवेश CET परीक्षेसाठी online फॉर्म भरण्याची सुरवात  

११ वी सामाईक प्रवेश परीक्षा परीक्षा नोंदणीस सुरुवात

21/07/2021
11 वी प्रवेश CET परीक्षेसाठी online फॉर्म भरण्याची सुरवात  

11 वी प्रवेश CET परीक्षेसाठी online फॉर्म भरण्याची सुरवात  

20/07/2021
10th-12th board exam timetable announced

10th-12th board exam timetable announced

21/12/2021
MSCE ने स्कॉलरशिप परीक्षा २०२१ चा निकाल जाहीर

MSCE ने स्कॉलरशिप परीक्षा २०२१ चा निकाल जाहीर

3
Screenshot 20211221 151345 Office Thakare Blog

ऑनलाईन गुगल क्लासरूम प्रशिक्षण

2
Elementary and Intermediate Drawing Grade Exam 2021-22 Online Application Process

Elementary and Intermediate Drawing Grade Exam 2021-22 Online Application Process

2
राज्यस्तरीय पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा पर्व -३

राज्यस्तरीय पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा पर्व -३

1
“अविरत टप्पा ४ “प्रशिक्षणाकरीता तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे ऑनलाईन प्रशिक्षण

“अविरत टप्पा ४ “प्रशिक्षणाकरीता तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे ऑनलाईन प्रशिक्षण

01/02/2023
सावित्रीबाई फुले निबंध मराठी

सावित्रीबाई फुले निबंध मराठी

03/01/2023

Happy New Year 2023 Wishes in Marathi

26/12/2022
ख्रिसमस नाताळ माहिती मराठी

ख्रिसमस नाताळ माहिती मराठी

20/12/2022

Recent News

“अविरत टप्पा ४ “प्रशिक्षणाकरीता तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे ऑनलाईन प्रशिक्षण

“अविरत टप्पा ४ “प्रशिक्षणाकरीता तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे ऑनलाईन प्रशिक्षण

01/02/2023
628
सावित्रीबाई फुले निबंध मराठी

सावित्रीबाई फुले निबंध मराठी

03/01/2023
3.5k

Happy New Year 2023 Wishes in Marathi

26/12/2022
3.5k
ख्रिसमस नाताळ माहिती मराठी

ख्रिसमस नाताळ माहिती मराठी

20/12/2022
686
ADVERTISEMENT
  • About us
  • Privacy Policy
  • Contact us
  • Disclaimer
Call us: +919168667007

© 2022 Thakare Blog - कुणीही वेबसाईट माहिती आमच्या परवानगी कोणत्याही ठिकाणी वापरू नये. वापरल्या कॉपीराईट कायद्या अंतर्गत कार्यवाही करण्यात येईल.Thakareblog.

No Result
View All Result
  • Home
  • शिक्षक कट्टा
  • विद्यार्थी कट्टा
  • Online शाळा
    • Courses
    • New registration
    • Login & Logout
    • Your Profiles
    • Edit Profile

© 2022 Thakare Blog - कुणीही वेबसाईट माहिती आमच्या परवानगी कोणत्याही ठिकाणी वापरू नये. वापरल्या कॉपीराईट कायद्या अंतर्गत कार्यवाही करण्यात येईल.Thakareblog.

Welcome Back!

Sign In with Facebook
OR

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Sign Up with Facebook
OR

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Alert: तुम्ही हि माहिती कॉपी करू शकत नाही.केल्यास कॉपीराईट नोटीस देण्यात येईल.