Table of Contents
जागतिक जल दिवस । इतिहास, थीम, माहिती मराठी
World Water Day Information in Marathi
पाणी (जल) म्हणजे जीवनाचा स्त्रोत आहे. या पाण्याचे महत्त्व टिकवून ठेवण्याकरिता दरवर्षी 22 मार्च रोजी जागतिक जल दिन (World Water Day) जगभरात साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस “नेचर फॉर वॉटर” या विषयाखाली साजरा केल्या जात आहे.
आज 663 दशलक्षहून अधिक लोकांना सुरक्षित पाणी मिळत नाही, शिवाय उपलब्धही नाही. प्रदुषित पाण्याचा वापरामुळे आरोग्यावर परिणाम होतो. या 21 व्या शतकाच्या पाण्यासंबंधीच्या आव्हानांवर मात करण्यासाठी आपण निसर्गाचा कसा उपयोग करू घेऊ शकतो याला दर्शविणारी ही संकल्पना आहे.
1. इतिहास
ब्राझीलच्या रियो द जेनेरियोमध्ये 1992 साली आयोजित पर्यावरण व विकास विषयक संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेत (UNCED) जागतिक जल दिनासाठी पुढाकार घेतला गेला. 1993 साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेकडून अधिकृतपणे 22 मार्चला ‘जागतिक जल दिन’ साजरा करण्यास घोषित करण्यात आले. प्रथम जागतिक जल दिन 1993 साली साजरा केला गेला होता.
पाणी हा आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे. पाणी पिण्यापासून ते साफसफाईपर्यंत आणि इतर उद्देश्यांमुळे, हे आपल्या दैनंदिन जीवनात एक अत्यावश्यक भूमिका निभावते. आपल्यापैकी बर्याचजणांना 24 तास वाहते पाणी मिळत असेल, परंतु जगात काही असे भाग आहेत तेथे पाणी मिळत नाही. वापरायला सोडा पिण्याला सुद्धा पाणी मिळत नाही.
जागतिक जलसंकटाचा परिणाम प्रत्येकावर एखाद्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होत आहे. म्हणूनच, या ग्रहावरील आपल्या अस्तित्वासाठी निर्णायक पर्यावरणीय संसाधनाच्या क्षीणतेवर प्रकाश टाकण्यासाठी प्रत्येक वर्षी २२ मार्च रोजी जागतिक जल दिन साजरा केला जातो. जेणेकरून लोकांना पाण्याचे महत्व कळों. जागतिक जल दिन माहिती आपण तेथे घेणार आहोत.
पाणी वाचवा घोषवाक्ये मराठी | Save water slogans in Marathi
2. World water day 2022 theme
Groundwater
या वर्षीच्या मोहिमेमध्ये भूजलाची पाणी आणि स्वच्छता व्यवस्था, शेती, उद्योग, परिसंस्था आणि हवामान बदल अनुकूलन यातील महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली जाईल.
या मोहिमेचा सर्वसमावेशक संदेश असा आहे की भूजलाचा शोध, संरक्षण आणि शाश्वत वापर करणे हे जगण्यासाठी आणि हवामान बदलाशी जुळवून घेण्यासाठी आणि वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्रस्थानी असेल.
Water is very important so everyone save the water. Unless we die without water.